Homeराजकीयअमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्याला यश, प्रधानमंत्री ग्राम...

अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्याला यश, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आदिवासी दुर्गम, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 14 कोटींचा निधी मंजूर

शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम दादा पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले असून रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत शिरपूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील विविध रस्त्यांच्या विकासकामांसाठी सुमारे 14 कोटी 8 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत सरकार यांच्या पत्रान्वये अधिकृत आदेश प्राप्त झाले आहेत. या निधीतून अनेक दुर्गम पाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडणारे महत्त्वाचे मार्ग विकसित होणार असून ग्रामस्थांची दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे.

शिरपूर तालुक्यातील जगदिश पाडा (खंबाळे) येथील 4.02 कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी 4 कोटी 49 लाख 18 हजार रुपये, नागेश्वर ते सोज्यापाडा येथील 3.01 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 4 कोटी 42 लाख 99 हजार रुपये, ईगन्यापाडा (फत्तेपूर फॉरेस्ट) येथील 1.65 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 2 कोटी 3 लाख 6 हजार रुपये, शेमल्या ते हनुमानपाडा येथील 1.70 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 88 लाख 15 हजार रुपये,  रामपुरापाडा ते धरमपुरा येथील 1.08 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 1 कोटी 25 लाख 14 हजार रुपये असा एकूण 14 कोटी 8 लाख 52 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम दादा पावरा यांच्या प्रयत्नांमुळे शिरपूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामांना गती मिळत असून ग्रामीण व आदिवासी भागाचा कायापालट होत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे कँट पार्किंग शुल्क वाढीमुळे नागरिकांची नाराजी आहे. पुणे बातम्या

पार्किंगच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुधारल्याशिवाय सुधारित शुल्कांना जनतेचा विरोध होत राहील, असे रहिवाशांनी सांगितले. पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) दुचाकी...

सुप्रिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) राज्य प्रमुखांनी विलीनीकरणाची चर्चा थांबवली, पक्षातील अनिश्चितता शमवली |...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पुणे/मुंबई: NCP (SP) ने बुधवारी सांगितले की पक्षाने इतर NCP गटात विलीन होण्याची शक्यता संपवली आहे. राज्य राष्ट्रवादीचे...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची मजल

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

वनराज खून प्रकरणातील संशयिताच्या भावावर पाच जणांनी गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला, पीडितेचा...

जखमी ऑटोरिक्षा चालक अक्षय म्हस्के हा त्याच्या तीनचाकीमध्ये नाश्त्यासाठी थांबला असताना बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला....

error: Content is protected !!