Homeआरोग्यदुधात फॉर्मालिन भेसळ नसल्याचे स्पष्ट; फक्त मिल्क फॅट कमी – अन्न व...

दुधात फॉर्मालिन भेसळ नसल्याचे स्पष्ट; फक्त मिल्क फॅट कमी – अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरपुर | प्रतिनिधी :

धुळे जिल्ह्यातील दूध नमुन्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या “दुधात मृतदेह जतनासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्मालिन रसायनाची भेसळ” या बातमीबाबत अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, सदर नमुन्यामध्ये फॉर्मालिनची भेसळ आढळलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरणात दुधातील मिल्क फॅट कमी असल्याने नमुना अप्रमाणित (Sub-standard) घोषित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, संबंधित म्हशीच्या दुधाचा नमुना अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा, संभाजीनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार त्या नमुन्यात मिल्क फॅट ४.३ टक्के आढळले असून नियमांनुसार ते किमान ५.० टक्के असणे आवश्यक असते. त्यामुळे तो नमुना अप्रमाणित ठरविण्यात आला. मात्र इतर कोणत्याही प्रकारची भेसळ नमुन्यात आढळलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने पुढे सांगितले की, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत दूधासारख्या नाशवंत अन्नपदार्थांचे नमुने संकलित करताना त्यांचे मूळ स्वरूप प्रयोगशाळेत पोहोचेपर्यंत अबाधित राहावे यासाठी फॉर्मालिन हे संरक्षक द्रव्य (Preservative) अत्यल्प प्रमाणात नमुन्यात टाकले जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार व अधिकृत पद्धतीने केली जाते आणि त्याची नोंद नमुना संकलनाशी संबंधित कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे केली जाते.सदर प्रकरणात देखील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुना घेताना नियमांनुसार फॉर्मालिन संरक्षक द्रव्य वापरले होते व त्याची नोंद कागदपत्रांमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे प्रयोगशाळेच्या विश्लेषण अहवालामध्ये फॉर्मालिनचा उल्लेख दिसून येतो. मात्र याचा अर्थ दुधामध्ये फॉर्मालिनची भेसळ करण्यात आली आहे असा होत नाही, असेही सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले.प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काही प्रसारमाध्यमांमध्ये विश्लेषण अहवालाचा चुकीचा अर्थ लावून फॉर्मालिन भेसळ झाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. अशा अपूर्ण अथवा चुकीच्या माहितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणात जबाबदार व्यक्तीविरुद्ध कंपाऊंडिंग केस क्रमांक १३/२०२६, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ दाखल करण्यात आलेली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!