Homeआरोग्यशिरपूरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई, नमुने...

शिरपूरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई, नमुने तपासणीसाठी पाठवले

शिरपूर (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुध उकळल्यानंतर ते रबरसारख्या गोळ्यात रूपांतरित झाल्याचा प्रकार उघड झाल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र हे दूध गरम करताच त्यामध्ये आश्चर्यकारक बदल दिसून आला. उकळल्यानंतर संपूर्ण दूध रबरसारख्या घट्ट गोळ्यात बदलले. हा गोळा हाताने तुटत असून त्याचा पोत पूर्णपणे कृत्रिम असल्याचे दिसून आले.
हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नेहमी त्याच दूध विक्रेत्याकडून दूध घेत असल्याने असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दुधाच्या शुद्धतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई
या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, धुळे यांनी तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली.
सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
अभिजीत जाधव – अन्न सुरक्षा अधिकारी
शशिकांत राणे – अन्न सुरक्षा अधिकारी
प्रमोद ईशी – पोलीस हवालदार
यांच्या पथकाने मौजे बालदे, ता. शिरपूर येथे तपासणी मोहीम राबवत संशयित दुधाचे नमुने घेतले. संबंधित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वीही घडला होता असा प्रकार
विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यात तीन ते चार महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र त्या घटनेनंतरही ठोस आणि कठोर कारवाई झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
भेसळयुक्त दुधामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुधात नेमकी कोणती रासायनिक भेसळ केली जाते याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील दुध विक्रेत्यांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येणार असून भेसळ करणाऱ्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!