Homeशहरधुळेकरांसाठी आधुनिक प्रवासाची नवी भेट..! धुळे शहरात १० अत्याधुनिक ई-बस सेवेला...

धुळेकरांसाठी आधुनिक प्रवासाची नवी भेट..! धुळे शहरात १० अत्याधुनिक ई-बस सेवेला हिरवा झेंडा; एसी सुविधा, मोबाईल चार्जिंगसह पर्यावरणपूरक वाहतुकीची सुरुवात

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने धुळे बस स्थानक येथे १० अत्याधुनिक ई-बस सेवांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या नव्या ई-बस सेवेमुळे धुळेकर नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

पूर्णतः वातानुकूलित असलेल्या या ई-बस मध्ये आरामदायी अॅडजस्टेबल सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट, आकर्षक अंतर्गत रचना आणि आधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रवाशांना अधिक सुखकर व तंत्रज्ञानस्नेही प्रवास मिळावा, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या ई-बसच्या संचालनासाठी धुळे आगार येथे ८ अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाढते प्रदूषण कमी करून स्वच्छ आणि हरित शहर उभारण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.

धुळे शहराच्या विकासाला गती देत सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येत आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आधुनिक ई-बस सेवा भविष्यातील स्मार्ट वाहतूक व्यवस्थेची सुरुवात ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

धुळे शहरासाठी ई-बस उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासन, परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.

यावेळी पुरुषोत्तम व्यवहारे (विभागीय नियंत्रक), उमेश बिरारी (विभागीय वाहतूक अधिकारी), पंकज देवरे (आगार व्यवस्थापक), हर्षल पाटील (सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक), समाधान खांडेकर (व्यवस्थापन पर्यवेक्षक), संजय अवस्थी (विभागीय वाहतूक अधिकारी), मनोज पवार (कनिष्ठ आगार व्यवस्थापक), अमित दुशाने यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापौरांनी भामा आसखेड युनिटला भेट दिली

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभागाला तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाधित भागातील पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व त्रुटी दूर...

बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्यांकडे लिंगनिश्चिती करणाऱ्या जोडप्यांचा पोलीस शोध घेणार आहेत

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील जोडप्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत ज्यांनी जन्मपूर्व लिंग निश्चितीसाठी...

मान्सून दक्षिण कोकणात दाखल; पण अंतर्गत महाराष्ट्राची प्रगती मंदावली | पुणे बातम्या

क्षितिजावर पावसाचे ढग तयार होतात पुणे: नैऋत्य मान्सून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात आणखी पुढे सरकण्याची अपेक्षा आहे, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्याच्या अतिरिक्त...

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिरपूरातील शेकडो युवकांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश डॉ....

शिरपुर| प्रतिनिधी धुळे येथील दुलारी गार्डनमध्ये शनिवारी (दि. ६ जून) शिवसेना (शिंदे गट) पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेना युवा नेते...

error: Content is protected !!