Homeक्राईमधुळे जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थांवर बुलडोझर; 9,536 किलो मुद्देमालाची विल्हेवाट

धुळे जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थांवर बुलडोझर; 9,536 किलो मुद्देमालाची विल्हेवाट

शिरपुर धुळे : अंमली पदार्थांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या ‘Zero Tolerance’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. धुळे जिल्ह्यातील विविध 13 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 9,536 किलो अंमली पदार्थांचा मुद्देमाल, ज्याची एकूण किंमत सुमारे 12 कोटी 47 लाख 30 हजार 450 रुपये आहे, त्याची रांजणगाव, पुणे येथे कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ‘नशा मुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. तसेच ‘नशामुक्त भारत-2029’ या संकल्पनेनुसार अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

याच मोहिमेचा भाग म्हणून 4 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड, रांजणगाव, जिल्हा पुणे येथे धुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

या कारवाईत उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (HLDDC) अंतर्गत 3,151 किलो अंमली पदार्थांची, तर RDDC अंतर्गत 6,385 किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. अशाप्रकारे एकूण 9,536 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹12,47,30,450 इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

या कारवाईत धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढोके तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईसाठी असई संतोष जाधव, पोहेकॉ सुरेश भालेराव, पोहेकॉ शिरीष भदाणे , पोहेकॉ तुपार सूर्यवंशी आणि पोकॉ नितीन दिवसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोट्यवधी रुपयांचा आणि तब्बल 9.5 टन वजनाचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याने धुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी कारवाईला मोठे बळ मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!