Homeताज्या बातम्याधुळे-शिरपूर-शिंदखेड्यात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! बिर्याणी, पनीर, खाद्यतेल आणि चॉकलेटचे...

धुळे-शिरपूर-शिंदखेड्यात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! बिर्याणी, पनीर, खाद्यतेल आणि चॉकलेटचे नमुने जप्त; बिनपरवाना सुरू असलेले खाद्यपदार्थांचे आस्थापन तात्काळ बंद

शिरपुर| प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार (दि. २१ जुलै २०२६) रोजी धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा येथे एकाच दिवशी धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत विविध खाद्यपदार्थांचे एकूण सात अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, बिनपरवाना व्यवसाय करणाऱ्या एका आस्थापनेवर थेट कारवाई करत ती तात्काळ बंद करण्यात आली.

धुळे शहरातील फॉर एव्हर वेलनेस केमिस्ट (मधुर संकुल, दत्त मंदिर, देवपूर), गर्ग एंटरप्रायझेस (मालेगाव रोड) आणि हॉटेल सिल्व्हर स्पून (साक्री रोड) या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पनीर, रिफा सोयाबीन ऑइल, डेअरी मिल्क मिल्किनीस आणि डेअरी मिल्क फ्रूट अँड नट या चार अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

त्यानंतर शिरपूर येथील एम.सी.एम. बिर्याणीवाला (करवंद नाका), गीतांजली – द हाऊस ऑफ बिर्याणी अँड थाळी (मनुदादा संकुल, शहादा रोड) तसेच शिंदखेडा येथील स्वामी समर्थ चायनीज सेंटर (मेन रोड) या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी चिकन तंदूर बिर्याणी, चिकन दम बिर्याणी आणि सोयाबीन चिली या तीन अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.

तपासणीदरम्यान स्वामी समर्थ चायनीज सेंटर, शिंदखेडा हे आस्थापन वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित आस्थापनेला नोटीस बजावून वैध अन्न परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

याशिवाय धुळे शहरातील मेन पोस्ट कार्यालयासमोरील तसेच अग्रसेन चौकातील फास्टफूड आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. सर्व तपासण्या अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत करण्यात आल्या असून, तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

बिनपरवाना अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आनंद पवार, श्री. शशिकांत राणे, श्री. अरविंद राऊत आणि श्री. मंगेश भावसार यांनी संयुक्तपणे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!