Homeक्राईमनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क; व्यायामशाळा–बाउंसरवर्गाला कडक सूचना

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क; व्यायामशाळा–बाउंसरवर्गाला कडक सूचना

धुळे : जिल्ह्यात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तयारी अधिक गडद केली आहे. निवडणूक काळात काही समाजकंटक व गंडांमार्फत ‘मसल पॉवर’चा वापर करून मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पूर्वानुभवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली आहे.

जिल्ह्यातील सर्व १७ पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीतील जिम, व्यायामशाळा, आखाडे, तसेच बाउंसर व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर यांना बोलावून स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

पोलिस प्रशासनाने दिलेल्या प्रमुख सूचना अशा—

समाजात दहशत निर्माण करणारी कोणतीही हालचाल किंवा कृती करू नये.

गुंड किंवा गुन्हेगारांना साथ देत शक्तीप्रदर्शन करू नये.

सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन, दडपशाही करणारी वक्तव्ये किंवा वागणूक टाळावी.

अवैध बॅनर, पोस्टर किंवा इतर माध्यमांद्वारे दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये.

भारतीय न्याय प्रक्रिया संहितेतील कलम १७८ (BNS) नुसार संबंधित व्यक्तींना नोटिसा देण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे आणि नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा अधिकार वापरता यावा, हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे पुण्यातील रेस्टॉरंट्समध्ये उष्णता वाढली आहे

स्वयंपाकघर आधीच इंधन वाचवण्यासाठी पर्यायी स्वयंपाक पद्धती वापरत आहेत पुणे : पेट्रोल, डिझेल, CNG आणि व्यावसायिक LPG च्या किमती येत्या काही दिवसांत आणखी...

सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या पाण्याच्या टँकरविरोधात सोमवारपासून धडक कारवाई : पुणे शहर पोलिस

पाण्याचे टँकर चालकांना एप्रिलमध्ये 360-डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती. पुणे : टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांमध्ये 360-डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे...

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

error: Content is protected !!