Homeताज्या बातम्याशिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चाकूचा धाक दाखवून आर्टीगा कार, रोकड...

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चाकूचा धाक दाखवून आर्टीगा कार, रोकड व मोबाईल लुटणारे दोघे चार तासांत जेरबंद

प्रतिनिधी – शिरपूर शहरातील मच्छीबाजार परिसरात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून ड्रायव्हरला मारहाण करत आर्टीगा कार, रोकड व मोबाईल जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने फक्त चार तासांच्या आत गजाआड केले. या शिताफीच्या कामगिरीने पोलिस दलाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

घटना – दुपारच्या वेळीच लूट

फिर्यादी जहांगिर खान दिलदार खान (वय ३५, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. देविचामळा, अक्तराबाद, मालेगाव, जि. नाशिक) हे दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या मालक सुभानखान अब्बासखान आणि भाऊ इब्राहिम दिलदार पठाण यांच्यासह मालेगावहून शिरपूर येथे आले. चोपडा रोडवरील झाडांची लाकडे वाहतूक करण्यासाठी पास घेण्यासाठी ते वनविभागाच्या कार्यालयात, खंडेराव मंदिराजवळ आले असता तिथे तीन अनोळखी इसम गाडीजवळ आले.

त्यातील एकाने पांढऱ्या हाफ बाह्यांचा टी-शर्ट (चॉकलेटी रेषा असलेला) परिधान केला होता. त्याने चाकू दाखवत फिर्यादीकडील ₹२०,००० रोकड आणि मोबाईल हिसकावून घेतला. दुसऱ्याने (फुलांच्या नक्षीचा शर्ट, डाव्या भुवईवर पांढरा डाग) कारची चावी बळजबरीने काढून घेतली. तिसरा इसम काळ्या रंगाच्या नक्षीदार टी-शर्टमध्ये ड्रायव्हर सीटवर बसून कार घेऊन पळून गेला. ड्रायव्हर जहांगिर खान यांनी आरडाओरडा केला तरी तिघे पसार झाले. नंतर त्यांनी आपल्या भावाला संपर्क साधला असता आरोपींनी धमकी दिली –

“५० हजार रुपये दे, नाहीतर कार परत मिळणार नाही!”

या घटनेवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस तपास – वेगवान आणि नियोजनबद्ध

पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांनी तत्काळ कारवाई करत डी.बी. पथकाला निर्देश दिले. फिर्यादीकडील वर्णन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आणि गुप्त माहितीच्या आधारे चार वेगवेगळी शोधपथके तयार करण्यात आली.

ही पथके शिरपूर, शिंदखेडा, नरडाणा व शहादा येथे रवाना झाली. सलग चार तासांच्या तडफदार शोधानंतर रामसिंग नगर येथील आर. सी. पटेल शाळेजवळ संशयास्पद आर्टीगा कार उभी असल्याची गुप्त माहिती पोउनि दिपक कुशारे यांना मिळाली. सापळा रचून पोलिसांनी तिथे पोहोचताच दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक आरोपींची माहिती

1️⃣ राकेश रावण कोळी (वय २९) 2️⃣ विजय सुरेश निकुंभे (वय ३०) दोघेही रा. गुजर खदे, ता. शिरपूर, जि. धुळे

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या वस्तू पोलिसांकडे जमा केल्या.

जप्त मालमत्ता (एकूण किंमत ₹६,३०,०००/-)किंमत

१पांढरी आर्टीगा कार (विना नंबर, चेसीस क्र. MAJFLEB1500149963)

₹५,००,०००/-

२पोको कंपनीचा मोबाईल

₹२०,०००/-

३रोकड रक्कम (₹५०० च्या ८ नोटा)

₹८००/-

४लोखंडी पाते व लाकडी मूठ असलेला चाकू

एकूण₹६,३०,०००/-

गुन्हेगारी पार्श्वभूमी

आरोपी विजय सुरेश निकुंभे याच्यावर आधीच दोन गुन्हे नोंद आहेत

🌟 पोलिस दलाचे एकत्रित यश

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोनि किशोरकुमार परदेशी, पोउनि दिपक कुशारे, पोउनि सुरेश बाविस्कर, तसेच डी.बी. पथकातील राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, अनिल सोनार, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटु साळुंके, आरीफ तडवी, मनोज महाजन, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सचिन वाघ, गोपाल माळी आणि भूपेश गांगुर्डे यांनी मोलाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!