Homeताज्या बातम्याशिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..! “टँगो पंच” बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त...

शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..! “टँगो पंच” बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बनावट देशी दारू व्यवसायाविरोधात शिरपूर शहर पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत “टँगो पंच” नावाची बनावट देशी दारू तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने नवे चांदसुर्या परिसरात ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वासर्डी रोडवरील एका संशयित घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी नितेंद्र पोपटराव पावरा (वय ३८, रा. नवे चांदसुर्या) हा बनावट देशी दारू तयार करताना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी घराची कसून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये स्पिरीटने भरलेल्या टाक्या, हजारो रिकाम्या “टँगो पंच” प्लास्टिक बाटल्या, बुच, स्टिकर्स, सिलबंद दारूच्या बाटल्या, इलेक्ट्रिक सिलिंग मशीन तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी — ४३५ लिटर स्पिरीट २२ हजार रिकाम्या बाटल्या ९० सिलबंद बाटल्या इलेक्ट्रिक सिलिंग मशीन स्टिकर्स, बुच, प्लास्टिक टाक्या, ट्रे व इतर साहित्य असा एकूण ₹३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी, विश्वजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोठनि. सुरेश सोनवणे, पोउनि दिपक कुशारे आणि पोलीस अंमलदार रविंद्र अखडमल, अतुल पाटील, सुनिल जावरे, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद अखडमल, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सचिन वाघ, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, शांतीलाल पावरा, सुशिल पाटील, प्रशांत पवार, भटु साळुंके, मपोकों, अनिता पावरा, स्वाती शहा, चापोकों. विजय पाटील, होमगार्ड मिथुन पावरा, सुनिल पावरा व लखन भोई अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरात अवैध सावकारीचा “काळा खेळ” उघड..! गरजूंना कर्जाच्या जाळ्यात अडकवून जमीन-घरांवर डल्ला; तिघांविरोधात...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहरात अवैध सावकारीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, सहकार विभागाने धडक कारवाई करत तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत अधिकृत...

आभासी मित्राने खराडी महिलेला 15.5 लाखांची फसवणूक केली

पुणे : फिनलँडमधून दागिने आणि कपडे पाठवण्याचे आमिष दाखवून खराडी येथील एका 28 वर्षीय महिलेला 'व्हर्च्युअल फ्रेंड'ने 15.50 लाख रुपयांना फसवले.गेल्या वर्षी...

महाराष्ट्र महिला आयोगासमोर 2,761 तक्रारी प्रलंबित, सरकारने अद्याप अध्यक्ष आणि सहा सदस्यांची नियुक्ती केली...

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर २० मार्चपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. पुणे : गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र राज्य महिला...

गिरिप्रेमी संस्थेतील तीन गिर्यारोहकांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले

डावीकडून: मिहीर जाधव, विवेक शिवडे, उमेश झिरपे, अखिल काटकर आणि निकुंज शहा.गिरिप्रेमीच्या चमूने गुरुवारी पहाटे एव्हरेस्टचे यशस्वी शिखर सर केलेडावीकडून: मिहीर जाधव, विवेक...

शहरात तरुणाने महिलेवर ॲसिड सदृश द्रव फेकले; पोलिसांनी त्याला काटक येथून पकडले

पुणे : त्याच दिवशी पहाटे 1.55 च्या सुमारास ताडीवाला रोडवर तिच्यावर आणि तिच्या पुरुष मित्रावर ॲसिड सदृश पदार्थ फेकल्याची तक्रार एका मुलीने...

error: Content is protected !!