Homeराजकीयगुलमोहर कॅश' प्रकरणात तिसरा संशयित ताब्यात, मुख्य आरोपी किशोर पाटीलही धुळ्यात दाखल!

गुलमोहर कॅश’ प्रकरणात तिसरा संशयित ताब्यात, मुख्य आरोपी किशोर पाटीलही धुळ्यात दाखल!

धुळे: धुळ्यातील बहुचर्चित ‘गुलमोहर कॅश’ प्रकरणात धुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात निष्पन्न झालेल्या तिसऱ्या अज्ञात संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गौतम नारायण वाघमारे (वय ४३, सध्या रा. पनवेल, मूळ गाव मुखेड, नांदेड) असे त्याचे नाव असून, त्याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यालाही आज धुळ्यात आणण्यात आले आहे.

धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या कक्षात तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोलनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

या प्रकरणात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पाटील यांचे निलंबनही करण्यात आले असून, या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या प्रकरणाच्या एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची घोषणा केली आहे.

धुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा कसून अभ्यास केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या, दिसलेल्या गाड्या कोणाच्या होत्या आणि या व्यक्ती गुलमोहर शासकीय विश्रामगृहात का आल्या होत्या, याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इतर व्यक्तींनाही ओळखून त्यांना तपासामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच, आरोपींचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) देखील पोलिसांना प्राप्त झाले असून त्यातून अधिक धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!