Homeताज्या बातम्यादोन लाखांची लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात; थाळनेर पोलीस ठाण्यातील चौघांवर गुन्हा...

दोन लाखांची लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात; थाळनेर पोलीस ठाण्यातील चौघांवर गुन्हा दाखल

शिरपुर प्रतिनिधी

कायद्याचे रक्षण करणाऱ्यांचाच कायदा हातात घेण्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यात उघडकीस आला आहे. वडिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करून अटक टाळण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारताना थाळनेर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस खात्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना खळबळजनक ठरली आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरुद्ध १८ ऑक्टोबर २०२३ रोजी थाळनेर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वडिलांना अटक होऊ नये, तसेच प्रकरणात ‘मदत’ करण्याच्या बदल्यात थाळनेर पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या मागणीमुळे हैराण झालेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर ८ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.

एसीबीचा सापळा अन् थरारक कारवाई

पडताळणी यशस्वी झाल्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने थाळनेर परिसरात सापळा रचला. नियोजित ठिकाणी तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा याने स्वतः पैसे हातात घेतले. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत पावराला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आरोपींची नावे

मुकेश गिलदार पावरा – पोलीस कॉन्स्टेबल (ब. नं. १५९३)

भूषण यशपाल रामोळे – पोलीस हवालदार (ब. नं. ०७)

धनराज वचन मालचे – पोलीस कॉन्स्टेबल (ब. नं. १४५८)

किरण सखाराम सोनवणे – पोलीस कॉन्स्टेबल (ब. नं. १६९६)

(सर्वांची नेमणूक – थाळनेर पोलीस स्टेशन)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणात पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे  पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!