Homeमहत्त्वाचेधुळे ग्रंथोत्सव-2025 या भव्यदिव्य साहित्यिक कार्यक्रमाचे शिरपूर येथे 17 व 18 जानेवारी...

धुळे ग्रंथोत्सव-2025 या भव्यदिव्य साहित्यिक कार्यक्रमाचे शिरपूर येथे 17 व 18 जानेवारी रोजी भव्य स्वरुपात आयोजन

शिरपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे ग्रंथोत्सव-2025 या भव्यदिव्य साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पस, शिरपूर येथे दि. 17 व 18 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल राहतील. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धुळे खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नंदुरबार खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार काशिराम दादा पावरा, आमदार किशोर दराडे, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार सत्यजित तांबे उपस्थित राहणार आहेत. तसेच धुळे जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद सीईओ अजीज करीम शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, महाराष्ट्र ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नाशिक सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार बबनलाल अग्रवाल, ट्रस्टी अतुल भंडारी, ट्रस्टी विजय भंडारी, ट्रस्टी विजय अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत.

या ग्रंथोत्सवाची सुरुवात दि. 17 जानेवारी 2026 रोजी ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथदिंडीचा शुभारंभ आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथून होणार आहे. ग्रंथदिंडीचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संस्थेच्या सचिव सौ. रेशा पटेल, कबचौ उमवि जळगाव व्यवस्थापन समिती सदस्य प्राचार्य डॉ. संजय सुराणा, अहिराणी साहित्यीक सुभाष अहिरे यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्य उद्घाटन कार्यक्रम पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता संपन्न होणार असून त्यानंतर धुळे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते होईल. त्यानंतर भोजन अवकाश ठेवण्यात आला आहे.

हा ग्रंथोत्सव वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरपूर येथे धुळे ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात “अहिल्याबाई होळकर : इतिहास, साहित्य आणि लोककल्याणाचा आदर्श” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. फुला बागुल (एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर) हे राहणार असून परिसंवादात प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (अध्यक्ष, खानदेश साहित्य संघ, धुळे), प्रा. डॉ. बी. एन. पाटील (निवृत्त प्राचार्य, पाचोरा), लेखिका श्रीमती दर्शना पवार (अमळनेर) यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे.

या परिसंवादातून अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक व लोककल्याणकारी कार्याला उजाळा मिळणार असून त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविले जाणार आहे. दुपारी 3 ते 5 या सत्रात विद्यार्थ्यांचे कला गुणात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये विद्यार्थी आपले कलागुण उपस्थितांसमोर सादर करतील. दि. 18 जानेवारी 2026 रविवारी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत “एआय युगातील वाचन-सवय आणि समज, एआय वाचन संस्कृती” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लेखक एम. के. भामरे (शिरपूर) हे राहतील. तसेच प्रा. डॉ. नितीन पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), डॉ. महेश लीला पंडित (शिक्षणतज्ञ, मुंबई), प्रा. डॉ. विकी गायकवाड (रुईया कॉलेज, मुंबई) यांचा प्रमुख सहभाग राहील.

या परिसंवादात बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती कशी टिकविता येईल, यावर सखोल चर्चा होणार आहे. यानंतर दुपारी 12 ते 1.30 या वेळेत कथाकथन सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी अहिराणी कथाकार प्रवीण माळी (शिरपूर) हे राहतील. या सत्रात विविध लेखक व कवी आपल्या कथा सादर करणार आहेत. त्यानंतर भोजन अवकाश ठेवण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात 2 ते 4 या वेळेत “क-कवितेचा” या बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक जगदीश देवपूरकर असून या संमेलनात विविध प्रसिद्ध कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शिरपूर लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल राहतील. प्रमुख उपस्थिती म्हणून शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी, धुळे जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा हे उपस्थित राहणार आहेत.

धुळे जिल्ह्यातील तसेच शिरपूर तालुक्यातील वाचकप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ग्रंथोत्सवाला यशस्वी करावे असे आवाहन धुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे. या भव्य ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी समन्वय समिती व ग्रंथोत्सव समन्वय समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!