Homeआरोग्यशिरपुरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार उघड — उकळल्यावर तयार झालं ‘रबर’!

शिरपुरात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार उघड — उकळल्यावर तयार झालं ‘रबर’!

शिरपूर  शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भेसळयुक्त दुधाचा उकळल्यावर रबरासारखा आकार तयार झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातील एका दुकानातून एका महिलेनं दूध खरेदी केलं. काही तासांनंतर दूध खराब झाल्याचं लक्षात आल्यानं तिनं ते उकळून पाहिलं. मात्र, उकळल्यानंतर दूध जाड, चिकट आणि रबरासारखं बनलं. महिलेनं तत्काळ याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, सणासुदीच्या काळात दूध विक्रीत मोठी वाढ होते. अशा काळात भेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार उघड झाल्यानं दूध विक्रेत्यांवर संशयाचे सावट पसरले आहे. नागरिकांनी संबंधित दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चौकशी सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की, संबंधित दूध विक्री केंद्राकडून नमुने घेतले जाणार असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील. तपास अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भेसळ करून नफा मिळवण्यासाठी काही व्यापारी दूधामध्ये रासायनिक घटक किंवा पावडर मिसळत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या मनात मात्र एकच प्रश्न निर्माण झाला आहे — आपण रोज पितो ते दूध खरंच शुद्ध आहे का?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!