Homeक्राईम**शिरपूरमध्ये क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश! इंग्लंड–ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन जुगार; १६ बुकींवर...

**शिरपूरमध्ये क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश! इंग्लंड–ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन जुगार; १६ बुकींवर गुन्हा दाखल**

शिरपूर : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळवल्याच्या संशयावरून १६ बुकींविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील प्रसिद्ध मल्हार रिजेन्सी हॉटेलात चालू असलेल्या बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी मोठी कारवाई केली.

पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना विश्वसनीय सूत्रांमार्फत माहिती मिळाली होती की, एका व्यक्तीमार्फत हॉटेलमध्ये बसून मोठ्या प्रमाणात क्रिकेट बेटिंगचे बुकिंग चालू आहे. माहितीची खात्री करून त्यांनी शनिवारी (ता. २२) रात्री सहकाऱ्यांसह हॉटेलवर छापा टाकला.

छाप्यात एक जेरबंद, मोठा मुद्देमाल जप्त

कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून

  • मोबाईल फोन,
  • विविध सिमकार्ड,
  • बुकिंग नोंदी असलेली वह्या,
  • रोकड रक्कम
    असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत संशयिताने इंग्लंड–ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळवण्यासाठी वेगवेगळ्या आयडी आणि पासवर्डचा वापर केल्याचे समोर आले.

मुंबई आणि मध्य प्रदेशातील जाळे उघडकीस

उपलब्ध माहितीच्या आधारे मुंबई आणि मध्य प्रदेशातील एकूण १६ बुकींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आणखी काही साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.

मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सुगावा

ऑनलाइन बेटिंगसाठी वापरलेले नेटवर्क, व्यवहारांची पद्धत आणि मिळालेल्या आयडींच्या आधारे मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मागोवा लागण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिरपूर  शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे क्रिकेट बेटिंग रॅकेटला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!