Homeक्राईमशिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई  कंटेनरमधून तब्बल ४४ लाखांच्या विदेशी दारूचा...

शिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई  कंटेनरमधून तब्बल ४४ लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त!

शिरपूर | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून विक्रीसाठी आणली जात असलेली तब्बल ₹४४ लाख ६३ हजार ८०० किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दि. ०७ मे २०२६ रोजी रात्री पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सेंधवा (मध्यप्रदेश) मार्गे धुळे दिशेने जाणाऱ्या RJ 32 GB 4036 या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला.रात्री उशिरा संशयित कंटेनर अडवून चालक सतिषकुमार पुडाराम जाट (रा. हरियाणा) याची चौकशी करण्यात आली. मात्र चालकाने मालाबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे वाहन पोलीस ठाण्यात आणून सकाळी पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये “ऑल सिझन्स”, “अंकल टॉम” आणि “रॉयल चॅलेंज” कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले. विशेष म्हणजे बाटल्यांवर “Only Sale For Union Territory Chandigarh” असे लेबल असल्याने महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी हा साठा आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जप्त मुद्देमालात समावेश:▪️ ऑल सिझन्स – १८० मिलीचे १६० खोके▪️ ऑल सिझन्स – ७५० मिलीचे ५० खोके▪️ अंकल टॉम – ७५० मिलीचे ४९ खोके▪️ अंकल टॉम – १८० मिलीचे १०० खोके▪️ रॉयल चॅलेंज – १८० मिलीचे ०७ खोके▪️ टाटा कंटेनर RJ 32 GB 4036 एकूण मुद्देमाल किंमत : ₹४४,६३,८००/-याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध  गुन्हा  दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत

.सदर कारवाई यांनी केली मा. श्री. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे) तसेच श्री. विश्वजोत जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोसई मनोज कचरे, संतोष पाटील,  संदीप ठाकरे, योगेश मोरे,  विजय दिवरे, स्वप्निल बांगर,  सुनील पवार,  अल्ताफ मिर्झा तसेच गुरुदास बडगुजर यांनी विशेष मेहनत घेत यशस्वी कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!