Homeराजकीयशिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

शिरपूर तालुक्यातील २०२५ ते २०३० या निवडणूक कालावधीसाठी ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, शिरपूर येथे आज तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच पदाचे इच्छुक उमेदवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनुसूचित क्षेत्रातील ५० ग्रामपंचायती अनुसूचित जमाती (पेसा) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यात नटवाडे, चाकडू, शेमल्या, हिंगोणीपाडा, जामण्यापाडा, न्यू बोराडी, रोहीणी, चिलारे, दुर्बडया, भोईटी, आणि इतर ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

बिगर अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जातींसाठी ४ ग्रामपंचायती – भोरटेक, रुदावली, अंतुर्ली आणि अर्थ बु. – आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी १४ ग्रामपंचायती आणि इतर मागासवर्गीयांसाठी १९ ग्रामपंचायती आरक्षित ठरविण्यात आल्या आहेत.

या व्यतिरिक्त, ३१ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून त्यात सावळदे, भोरखेडा, लोंढर, ताजपुरी, करवंद, उंटावद, अजंदे खु., बाभुळदे, तरडी, जैतपूर, आमोदे, बोरगाव इत्यादींचा समावेश आहे.

आरक्षण प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडली असून, येणाऱ्या निवडणुकीत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने आरक्षणाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार श्री. महेंद्र माळी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!