Homeक्राईमशिरपूर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने गांजा शेतीविरोधात मोहीम सुरू -पोलिस व वनविभागाची संयुक्त...

शिरपूर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने गांजा शेतीविरोधात मोहीम सुरू -पोलिस व वनविभागाची संयुक्त कारवाई

शिरपूर, प्रतिनिधी

सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम वनक्षेत्रात गुपचूप सुरू असलेल्या गांजा शेतीविरोधात शिरपूर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने मोठी मोहीम उघडली आहे. ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत असलेल्या पाहणी मोहिमेत गेल्या दोन दिवसांत आंबे, रुपसिंगपाडा, खंबाळे, आसरापाणी, लाकड्या हनुमान आणि चिलारे परिसरात गांजा शेतीचे पट्टे शोधण्यात यश आले आहे. पुढील एक महिना या मोहिमेद्वारे अशा बेकायदेशीर शेतीचा संपूर्ण बंदोबस्त करण्यात येणार आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 48 गावे आणि 144 लहान-मोठे पाडे आहेत. हा परिसर सातपुडा पर्वत रांगेस समांतर पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे 50 कि.मी. पसरलेला आहे. पूर्वेस आंबे व वरला ही गावे असून पश्चिमेस मालकातर गाव आहे. या हद्दीतील बहुतांश जमीन वनविभागाच्या मालकीची असून अनेक ठिकाणी वनपट्टे वाटप झाले आहेत. काही भागात मात्र जंगलतोड करून अनधिकृतरीत्या अतिक्रमण करून गांजा शेतीचा गैरप्रकार सुरू असल्याचे पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे समोर आले.

सातपुडा पर्वतरांगांच्या विस्तीर्ण परिसरात दि. 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशेष गस्त आणि ड्रोनच्या सहाय्याने पाहणी मोहीम राबवली जात आहे.

मा. पोलीस अधीक्षक, सो. धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याकडून यापूर्वी अनेक वेळा छापे टाकण्यात आले आहेत. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत गावोगावी जनजागृती मोहिमाही राबवण्यात आली आहे. तरीसुद्धा काही गावांमध्ये लपूनछपून नाल्यांच्या काठावर, डोंगरउतारांवर, झाडाझुडपांच्या आडोशाला अंतरपीक म्हणून गांजा शेती सुरू ठेवली जात असल्याचे उघड झाले आहे.

मानवबळाच्या मर्यादेमुळे या दुर्गम भागांमध्ये पायी गस्त घालणे आव्हानात्मक ठरत असल्याने, पोलीस ठाण्याकडून वनविभागाला संयुक्त मोहिमेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार प्रादेशिक व वन्यजीव विभाग, शिरपूर यांच्या सहयोगाने 10 ते 30 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत सांगवी, बोराडी, शिरपूर व अनेरडॅम या चार वनपरिक्षेत्रातील 20 कर्मचारी आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे 15 अंमलदार अशा एकूण 35 जणांचा समावेश आहे. हे पथक गांजा प्रवन भागांमध्ये पायी गस्त तसेच आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पाहणी करत आहे.

मागील दोन दिवसांत आंबे, रुपसिंगपाडा, खंबाळे, आसरापाणी, लाकड्या हनुमान आणि चिलारे या गावांच्या वनजमिनीवर ड्रोनच्या मदतीने गांजा शेतीचा शोध घेण्यात यश आले आहे. पुढील एक महिना ही मोहीम अखंडितपणे सुरू राहणार असून, गांजा शेती करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

धुळे पोलीस दल आणि वनविभाग यांनी ग्रामस्थांना इशारा दिला आहे की, कोणीही पुढे गांजा पिकाची शेती करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांना कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही मोहीम नागरिकांच्या सहकार्याने गांजा शेतीला आळा घालून परिसर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!