Homeक्राईमशिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील दरोड्यातील ५ आरोपी जेरबंद तब्बल १९...

शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील दरोड्यातील ५ आरोपी जेरबंद तब्बल १९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत – सीमापार समन्वयातून उल्लेखनीय कामगिरी

शिरपूर (प्रतिनिधी) मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास घडलेल्या धाडसी दरोड्याचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत पाच आरोपींना शिताफीने अटक केली. या कारवाईत एकूण ₹19,12,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सीमापार समन्वयातून शिरपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पहाटेचा थरार – कारखान्यात घुसून मारहाण, कारसह ऐवज लंपासआज दि. 03/03/2026 रोजी सकाळी 7.30 वाजता सेंधवा ग्रामीण पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकाऱ्यांनी शिरपूर तालुका व शहर पोलिसांना तातडीची माहिती दिली.सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज (अगरबत्ती व सुगंधी द्रव्य निर्मिती कारखाना) येथे पहाटे 3.00 ते 4.00 दरम्यान 5 ते 7 अज्ञात इसमांनी अनधिकृत प्रवेश करून:वॉचमन व 5 मजुरांना मारहाणसुमारे ₹1,00,000 रोख रक्कम 3 मोबाईल फोनअंदाजे ₹10 लाख किंमतीची ग्रे रंगाची सियाझ कार (MP 13 ZR 8510)असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. गुन्ह्यासाठी लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार वापरल्याची माहितीही देण्यात आली. दोन्ही वाहने शिरपूरच्या दिशेने येत असल्याचे समजताच तातडीने नाकाबंदीचे आदेश देण्यात आले.नाकाबंदी व पाठलाग – शिरपूर पोलिसांची चपळता शिरपूर तालुका पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे व शिरपूर शहर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांनी बोराडी गाव, वाघाडी टी-पॉईंट व शिरपूर टोल नाका येथे नाकाबंदी लावली.नाकाबंदी दरम्यान:आरोपी फिरोज कचरु सैयद (रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) याला चोरीस गेलेली सियाझ कारसह शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, इतर आरोपी लाल रंगाच्या स्विफ्ट कारने पसार झाले. चित्रपटालाही लाजवेल असा पाठलाग वाघाडी टी-पॉईंटवर पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपींनी भरधाव वेगाने वाहन पळविले. करवंद नाका – गुजराती कॉम्प्लेक्स – अमोदे – शिरपूर फाटा – चोपडा फाटा – थाळनेर – मांजरोद – कुरखळी मार्गे वाहन पळवण्यात आले.शेवटी आरोपींनी सावळदे गावाजवळ तापी नदी किनारी लाल रंगाची स्विफ्ट कार सोडून नदीकाठाने पळ काढला.मात्र पोलिसांनी गावागावांत आधीच सतर्कता संदेश दिला होता.ग्रामस्थांच्या मदतीने ४ आरोपी जेरबंद सावळदे, कुरखळी दहिवद व परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची मदत केली. विशेषतः:श्री. सचिनसिंग राजपूत ( उपसरपंच सावळदे)श्री. मुकेश धनगर (सरपंच, कुरखळी)मयूर राजपूत ( सामाजिक कार्यकर्ता रा. दहिवद)आबा कोळी (रा. थाळनेर)यांच्या सहकार्याने पोलिसांनी पाठलाग करून पुढील आरोपींना अटक केली:विशाल अनिल दामोदरे (26, वरवंड, ता. दौंड)रमेश बापु करडे (52, केळगाव, ता. दौंड)श्याम तानाजी साळुंखे (29, हडपसर, पुणे)संतोष आण्णा शिवरकर (30, बोरीपारधी, ता. दौंड) जप्त मुद्देमाल (₹9,12,000/-)लाल रंगाची मारुती स्विफ्ट (MH 12 UC 0302) – ₹5,00,000रोख रक्कम – ₹30,0004 अँड्रॉईड मोबाईल – ₹40,0001 मोबाईल – ₹1,00037 किलो सुगंधी तेलाचे 4 ड्रम – ₹3,70,000 193 किलो आडजातीची लाकडे – ₹1,000पूर्वी जप्त सियाझ कार (₹10 लाख) धरून एकूण ₹19,12,000/- मुद्देमाल हस्तगत.

ही कारवाई यांनी केली  पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शिरपूर शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशीपोलीस उपनिरीक्षक श्री. हेमंत खैरनार रविंद्र अखडमल राजेंद्र रोकडे योगेश दाभाडे गोविंद कोळीश्री. विनोद अखडमल भटु साळुंखे आरिफ तडवी सोमा ठाकरे सचिन वाघ प्रशांत मनोज दाभाडे मनोज महाजन शिरपूर तालुका पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक श्री. जयपाल लक्ष्मण हिरे अल्ताफबेग अस्मानबेग मिर्झा संजय आसाराम चव्हाण वाला पुरोहित मनोज नेरकरहोमगार्ड श्री. दिपक बच्छाव होमगार्ड श्री. गौतम सत्तेसा कारवाई सहभागी होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!