Homeराजकीयशिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ अर्ज दाखलाचा अंतिम दिवस उत्साहात; नगराध्यक्ष पदासाठी...

शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ अर्ज दाखलाचा अंतिम दिवस उत्साहात; नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५८ अर्ज दाखल

शिरपूर : शिरपूर-वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेला आज निर्णायक वळण मिळाले. अर्ज दाखल करण्याचा आज (१७ नोव्हेंबर) अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती. उमेदवार, त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींनी परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू असलेली राजकीय धावपळ आज शिगेला पोहोचली.

नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार मैदानात

अंतिम दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताच नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या नावांनी शिरपूर-वरवाडेच्या राजकारणात वेगळीच उर्जा निर्माण केली आहे—

भूपेशभाई पटेल

चिंतनभाई पटेल

रामदास पुरी

हेमंतभाऊ पाटील

अरबाज तेली

शाबीर पिंजारी

या सहा उमेदवारांनी आक्रमक तयारी सुरू केल्याने निवडणूक प्रचारात रंगत वाढण्याचे संकेत आजच स्पष्ट झाले आहेत.

नगरसेवक पदासाठी विक्रमी १५८अर्ज

नगर परिषदेत १७ प्रभागांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आजच्या दिवसातच तब्बल ९७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्व दिवसांचा मिळून एकूण आकडा १५८वर जाऊन पोहोचला आहे. या विक्रमी अर्जांमुळे निवडणूक स्पर्धा अधिक चुरशीची आणि अनिश्चिततेने भरलेली होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

दिवसनिहाय अर्जांचा तपशील (नगराध्यक्ष / नगरसेवक)

१० नोव्हेंबर : ० / ०

११ नोव्हेंबर : ० / ०

१२ नोव्हेंबर : ० / ०

१३ नोव्हेंबर : ० / १

१४ नोव्हेंबर : ० / २

१५ नोव्हेंबर : ३ / १८

१६ नोव्हेंबर : ० / ४०

१७ नोव्हेंबर : ३ / ९७ ➡️ एकूण : ६ / १५८

निवडणूक कार्यालयात उत्साह, समर्थकांची गर्दी

अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच रांगा पाहायला मिळाल्या. विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून आपल्या उमेदवारांचा उत्साह वाढवला. महिलांची, युवा उमेदवारांचीही मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली. अनेक ठिकाणी समर्थकांनी फटाके, ढोल-ताशांनी वातावरण दणाणून सोडले.

निवडणूक कर्मचाऱ्यांनीही मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज हाताळत प्रक्रियेचे सुरळीत संचालन केले.

पुढील निवडणूक कार्यक्रम

१८ नोव्हेंबर – सकाळी ११ वाजता : अर्जांची छाननी

१९ ते २१ नोव्हेंबर – दुपारी ३ वाजेपर्यंत : अर्ज मागे घेण्याची मुदत

२५ नोव्हेंबर – दुपारी ३ वाजेपर्यंत : अपिलाच्या स्थितीत अंतिम माघारी

२६ नोव्हेंबर : निवडणूक चिन्हांचे वाटप

२७ ते ३० नोव्हेंबर : अधिकृत प्रचार (३० नो. रात्री १० वाजेपर्यंत)

२ डिसेंबर : मतदान (सकाळी ७.३० ते ५.३०)

३ डिसेंबर : सकाळी १० पासून मतमोजणी

चुरशीची लढत अनिवार्य

नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५८ उमेदवार रिंगणात असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत रोमहर्षक आणि रंगतदार होणार आहे. राजकीय समीकरणे, प्रभागनिहाय स्पर्धा, युवा उमेदवारांची एन्ट्री आणि पक्षीय-अपक्ष यांचे मिश्रण या सर्वांमुळे शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणूक २०२५ ही विशेष ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!