Homeमहत्त्वाचे“साहेबांच्या मर्जीतला कॉन्स्टेबल? मुख्यालयाला बगल, थेट ठाण्यात एन्ट्री!” मागील वर्षी ‘ऑर्डर’वर तैनात;...

“साहेबांच्या मर्जीतला कॉन्स्टेबल? मुख्यालयाला बगल, थेट ठाण्यात एन्ट्री!” मागील वर्षी ‘ऑर्डर’वर तैनात; बदलीच्या खेळात नियमांची ऐशीतैशी; शिरपूर तालुका ठाण्यात ‘वीआयपी पोस्टिंग’ची खमंग चर्चा..!

शिरपूर |प्रतिनिधी

धुळ्याच्या पोलीस वर्तुळात सध्या एकाच ‘बदली-बॉम्ब’ची चर्चा तोंडातोंडी रंगलीय! नंदुरबारमधून धुळे जिल्ह्यात बदली होऊन आलेला एक ‘लकी’ कॉन्स्टेबल थेट मुख्यालयाला बगल देऊन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात ‘साहेब’ म्हणून अवतरलाय. ना मुख्यालयात हजेरी, ना आदेशाची वाट… थेट ‘वरून फोन’ आणि पोस्टिंग ओके!

नियम फक्त सर्वसामान्यांसाठी?

सर्वसाधारण कॉन्स्टेबल ते अधिकारी… बदली झाली की पहिला मुजरा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दारात. हजेरी लाव, आदेश घे, मग जिथे सांगतील तिथे जा. हा नियमाचा ‘श्रीगणेशा’! पण इथे तर गणपती बसायच्या आधीच विसर्जन झालं. संबंधित ‘साहेबांचा खास’ कॉन्स्टेबल मुख्यालयात डोकावलाच नाही आणि सरळ शिरपूर तालुका ठाण्याच्या खुर्चीत विराजमान झाला.

‘आशीर्वाद’ कोणाचा? मंत्रालय की बंगला?

ठाण्यात कुजबुज सुरू आहे – “वरून फोन आला रे!” हा ‘वर’ कोण? कोणत्या बड्या नेत्याचा पीए? की कोणत्या ‘साहेबांच्या’ बंगल्यावरून ग्रीन सिग्नल? कॉन्स्टेबलच्या या ‘वीआयपी ट्रीटमेंट’मागे कोणता ‘गॉडफादर’ आहे, यावरूनच सध्या खाकी वर्दीत जोरदार खलबतं सुरू आहेत.

RTI चा बॉम्ब फुटणार!

या ‘मलाईदार पोस्टिंग’चा वास येताच एका जागरूकाने माहिती अधिकाराचा बॉम्ब टाकलाय. “मुख्यालयात हजेरीची नोंद कुठाय? पोस्टिंगचा आदेश कोणी काढला? सही कोणाची?” – असे तिखट सवाल विचारले जात आहेत. कागदपत्रं बाहेर आली की अनेकांच्या खुर्च्या हादरणार, हे नक्की!

सामान्य कॉन्स्टेबलमध्ये संतापाची लाट-

इकडे वर्षानुवर्षे एकाच ठाण्यात खितपत पडलेले, बदलीसाठी चकरा मारणारे कॉन्स्टेबल आता विचारतायत – “नियम फक्त आमच्यासाठीच का? आम्हाला मुख्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात आणि ‘यांना’ थेट रेड कार्पेट?”

आता पुढे काय? SP घेणार का दखल?

सगळ्यांचे डोळे आता धुळे SP साहेबांकडे लागलेत. ही ‘नियमबाह्य’ पोस्टिंग रद्द होणार? की ‘आशीर्वाद’ देणाऱ्या हातापुढे कायद्याचं पुस्तक मिटणार? या ‘बायपास पोस्टिंग’ची फाईल उघडली तर आतून आणखी किती ‘हाडं’ बाहेर निघतील, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

एकच सवाल:-

खाकी वर्दीवरचा विश्वास टिकवायचा असेल, तर ‘साहेबांचा माणूस’ आणि ‘सामान्य कॉन्स्टेबल’ हा भेद मिटवावाच लागेल. नाहीतर उद्या प्रत्येक बदली ‘सेटिंग’नेच होईल!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कारच्या धडकेने पेंटिंग कामगाराचा मृत्यू

पुणे : एका 48 वर्षीय पेंटिंग कामगाराचा त्याच्यावर उलटणारी कार गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी आंबेगाव येथील दत्तनगर येथे पीडित महिला कारच्या...

डिसेंबरपर्यंत ७०% फ्लीट टेक स्नॅग-मुक्त होईल: MSRTC

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : नवीन बसेसचा समावेश आणि जुनी वाहने स्क्रॅप केल्याने MSRTC च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असे...

गँगस्टर घायवालचा भाऊ सचिन याला राजस्थानमधील सीकर येथून अटक करण्यात आली आहे

सचिन घायवळ (वय 48, रा. कोथरूड) याला मकोका प्रकरणात अटक करण्यात आली पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेने बुधवारी रात्री कोथरूड येथील सचिन...

गोंधळात टाकणारे निर्देश आणि अंमलबजावणीच्या भीतीमुळे इंधन पंपांनी कॅनमधील डिझेल विक्री थांबवली

जिल्हा प्रशासनाने कोणतीही ब्लँकेट बंदी लादल्याचा इन्कार केला आहे. पुणे : पुण्यातील इंधन पंप चालकांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात रुग्णालये, शाळा, बँका, गृहनिर्माण संस्था,...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

error: Content is protected !!