Homeताज्या बातम्याधुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची राज्यभर दखल..! बार कौन्सिल ऑफ...

धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची राज्यभर दखल..! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्यपदी ॲड. ज्ञानेश्वर बागुल यांचा दणदणीत विजय

शिरपूर | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत शिरपूरचे सुपुत्र तथा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ज्ञानेश्वर बागुल यांनी दणदणीत विजय मिळवत सदस्यपद पटकावले आहे. राज्यभरातील वकिलांचा विश्वास संपादन करत त्यांनी या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवले.

गेल्या 26 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात यशस्वीपणे वकिली करणारे ॲड. बागुल हे धुळे बारचे सक्रिय सदस्य आहेत. एकल संक्रमण मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध बार असोसिएशनमधून मोठ्या प्रमाणात प्रथम पसंतीची मते मिळाली.

विशेष म्हणजे धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री, दोंडाईचा यांच्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वकिलांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना सर्वाधिक प्राधान्यक्रमाची मते प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र शासनाचे पॅनल ॲडव्होकेट म्हणून कार्यरत असलेले ॲड. बागुल यांनी धुळे जिल्हा परिषद, शिरपूर, चोपडा व नंदुरबार नगर परिषद तसेच विविध सहकारी संस्था, साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्थांचे कायदेशीर प्रतिनिधित्व केले आहे. अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावी युक्तिवाद करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शिरपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा कुसुमताई बागुल आणि ज्येष्ठ समाजसेवक सुरेश बागुल यांचे सुपुत्र असलेल्या ॲड. ज्ञानेश्वर बागुल यांच्या विजयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बार कौन्सिलमध्ये त्यांच्या नेतृत्वामुळे वकिलांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, तसेच न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास विधी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खरीप हंगामात एल निनोचा धोका वाढल्याने 181 महा ब्लॉक्स कृषी तणावासाठी अत्यंत असुरक्षित आहेत

एल निनोच्या चिंतेमध्ये राज्य खरीप हंगामाकडे जात असताना या अहवालाला महत्त्व प्राप्त झाले आहे पुणे : महाराष्ट्रातील एकूण 353 पैकी निम्म्याहून अधिक (181)...

हुक्का फ्लेवर्स, गांजा, दारूवर बंदी : पुण्यात रात्री उशिरा पार्टी छाप्यात 107 पुरुष, 49...

पुणे रेव्ह पार्टीतून अल्पवयीन मुलांसह १५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर...

पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाला अटक

पुणे : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत येथील रहिवासी (२६) यांना खडक पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.२० च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात कर्मचाऱ्यांना...

मान्सूनने महाराष्ट्राचे दार ठोठावले आहे, परंतु कोरड्या हवेच्या ड्रॅगने देशांतर्गत कूच करण्याचा धोका आहे

दक्षिण कोकणात शनिवारी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा आणि आशा निर्माण झाली. पुणे: नैऋत्य मोसमी पावसाने किनारपट्टीच्या काही भागात प्रवेश केल्याने...

दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापौरांनी भामा आसखेड युनिटला भेट दिली

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभागाला तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत आणि बाधित भागातील पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व त्रुटी दूर...

error: Content is protected !!