Homeक्राईमधुळ्यातील सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी अखेर जेरबंद

धुळ्यातील सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी अखेर जेरबंद

धुळे शहरातील देवपूर परिसरातील सावरकर पुतळा चौकात सराफा व्यापाऱ्यांवर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणारी कुख्यात आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. उत्तरप्रदेशातून आणलेल्या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी मुद्देमालासह सोन्याचे दागिने, कार, पिस्तुल आणि बनावट नंबर प्लेट्स जप्त केल्या आहेत.
घटना :
२३ जुलै २०२५ रोजी रात्री आठ वाजता व्यापारी विनय मुकेश जैन आणि त्यांचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी हे एस.टी. बसने धुळ्यात उतरले. सावरकर पुतळा चौकात आल्यानंतर काळ्या मोटारसायकलवर तिघेजण आले. त्यांनी हेल्मेट व मास्क घालून पिस्तुलाचा धाक दाखवला, गोळीबार केला आणि व्यापाऱ्यांकडील ३५०० ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याच्या पावत्या असलेली बॅग हिसकावून पोबारा केला.
या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्याने अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास :
गुन्ह्यात आरोपींची कोणतीही ओळख नसताना पोलिसांनी धुळे शहरातील हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित वाहनांचे नंबर मिळवले. तपासादरम्यान आरोपी मुंबईमार्गे आल्याचे समोर आले. पुढील शोध घेतल्यावर ते प्रतापगढ (उत्तरप्रदेश) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना धुळे येथे आणण्यात आले.
अटक आरोपी :
१. मोहंमद शहरेवार मोहंमद इबरार खान (वय २४, रा. ग्राम बहरापूर, ता. मांधाता, जि. प्रतापगढ, ह.मु. वडाळा, मुंबई) २. दिलशान इमरान शेख (वय २१, रा. यहियापूर, ता. दिलीपपूर, जि. प्रतापगढ, ह.मु. कुर्ला, मुंबई)
दोन्ही आरोपी प्रतापगढ येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आधीच अटकेत होते. त्यांना २३ ऑगस्ट रोजी धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमाल :
२६२.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹२४,५१,७००/-)
मारुती सुझुकी स्विफ्ट VDI कार (MH 15 EB 4516)
गावठी पिस्तुल व मॅगझिन
बनावट नंबर प्लेट्स (२)
मास्क, रुमाल, धारदार कटर
गुन्हेगारी पार्श्वभूमी :
शहरेवार खान याच्याविरुद्ध प्रतापगढ व प्रयागराज येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोरी, गँग अॅक्ट, हत्यार कायदा अशा गुन्ह्यांसह डझनभर गुन्हे नोंद आहेत.
दिलशान शेख याच्याविरुद्धही प्रतापगढ जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांचे यश :
ही कारवाई यांनी केली मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे व मा. श्री. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. श्रीराम पवार, पोउनि. चेतन मुंढे, सहा. पोउनि. सतिष जाधव, पो.हवा. राहुल सानप, पो.हवा. आरीफ पठाण, पो.हवा. पवन गवळी, पो.हवा. देवेंद्र ठाकुर, पो.कॉ. मयूर पाटील तसेच सहा. पोउनि. संजय पाटील, पो.कॉ. अमोल जाधव व चा. पो.हवा. कैलास महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!