Homeताज्या बातम्याATM चोरट्यांचा थरार संपला! शिरपूर शहर पोलिसांचा 45 मिनिटांचा सिनेमॅटिक पाठलाग...

ATM चोरट्यांचा थरार संपला! शिरपूर शहर पोलिसांचा 45 मिनिटांचा सिनेमॅटिक पाठलाग पिकअपसह दोन सराईत आरोपी गजाआड

शिरपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्रभर ATM मशीन फोडून बँकिंग व्यवस्थेला हादरवणाऱ्या टोळीचा अखेर शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दि. 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 02.15 वाजता, उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा ATM मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढून चोरी करण्याचा थरारक प्रयत्न सुरू असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली.क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले. काही अंतरावरच पित्रेश्वर स्टॉपजवळ संशयास्पद पिकअप आढळताच आरोपींनी पोलिसांना पाहून थेट शहादा फाट्याकडे पलायन केले.

45 मिनिटे… वेग, धूर आणि ठिणग्या!

मुंबई–आग्रा महामार्ग, नाकाबंदी, बॅरिकेट्स उडवत, दहिवद गावात घुसत, पुन्हा महामार्गावर येत आरोपींनी पोलिसांना अक्षरशः झुलवले. पिकअपला बांधलेली 20 फूट लोखंडी साखळी रस्त्यावर घास घेत ठिणग्या उडवत होती, तरीही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग सोडला नाही.पोलिसांचा ससेमिरा सुटत नाही हे लक्षात येताच आरोपींनी चालत्या वाहनातून उड्या मारून पळ काढला.तपासचक्र फिरलं… आणि मुसक्या आवळल्या!पो.नि. किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास पथक उभे राहिले आणि काही तासांतच टोळीपर्यंत पोलीस पोहोचले.अटक करण्यात आलेले आरोपी—• हेमंत सुकलाल माळी (21), भिरडई, धुळे• विदुर उर्फ विजय देवा जाधव (40), वसंतनगर, पारोळा, जळगावचौकशीत धक्कादायक बाब समोर आली—YouTube पाहून ATM फोडण्याचे धडे, आणि प्रत्यक्ष गुन्ह्यांची मालिकाच!शिरपूर, धुळे व अंमळनेर येथील अनेक ATM फोडी या टोळीने केल्याचे उघड झाले असून, आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना सलाम!

ही कारवाई यांनी केली

पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अजय देवरे तसेच उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी, पोउनि/संदिप दरवडे, पोहेकॉ रविंद्र आखडमल, राजेंद्र रोकडे, पोकॉ/आरीफ तडवी, सचिन वाघ, जितेंद्र आहिरराव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटु साळुंके, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे व चा.पो.कॉ. रविंद्र महाले अशांनी मिळून केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!