Homeताज्या बातम्याअनुदान मंजुरीसाठी ५ हजारांची लाच ठरली महागात कृषी अधिकाऱ्यांसह डाटा एंट्री ऑपरेटर...

अनुदान मंजुरीसाठी ५ हजारांची लाच ठरली महागात कृषी अधिकाऱ्यांसह डाटा एंट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात?

शिरपूर (प्रतिनिधी):

शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील लाचखोरीचा गंभीर प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उघडकीस आणत धडक कारवाई केली आहे. शासकीय अनुदान मंजुरीसाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना डाटा एन्ट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील (वय ३२) याला रंगेहात पकडण्यात आले असून, या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार (वय ४३) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अनुदानाच्या नावाखाली लाचेची मागणी

तक्रारदार यांचे शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे शासनमान्य बी-बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना गव्हाच्या बियाण्यांचे वितरण करण्यात येते.

सन २०२५–२६ मध्ये तक्रारदारांनी ९० शेतकऱ्यांना गव्हाचे बियाणे विक्री केले होते. या विक्रीवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुमारे १ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली होती.

“पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे जाणार नाही”

अनुदान प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर सुनील पाटील याने थेट तक्रारदारांकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना द्यावी लागेल, असे सांगत काम अडवून धरल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी ११ फेब्रुवारी रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

एसीबीचा सापळा अन् रंगेहात अटक

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी एसीबी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सुनील पाटील याने तक्रारदारांकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले. तपासादरम्यान या लाच मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनीही दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

एसीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल, तसेच यशवंत बोरसे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!