Homeताज्या बातम्याधुळे जिल्ह्यात 19.19 लाखांचा प्रतिबंधित राजश्री गुटखा जप्त आठवड्यात दुसऱ्यांदा धडक कारवाई;...

धुळे जिल्ह्यात 19.19 लाखांचा प्रतिबंधित राजश्री गुटखा जप्त आठवड्यात दुसऱ्यांदा धडक कारवाई; सांगवी पोलिस व अन्न-औषध प्रशासनाचा संयुक्त दणका

शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्ट (सांगवी) येथे सांगवी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजश्री पान मसाला, गुटखा व तंबाखूचा तब्बल 19 लाख 19 हजार रुपयांचा साठा जप्त केला. याच आठवड्यात गुटखा तस्करीविरोधात ही दुसऱ्यांदा मोठी कारवाई झाल्याने तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी MP-07 GB-1618 क्रमांकाचे आयशर वाहन हाडाखेड चेकपोस्टवर अडवून तपासणी केली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजश्री पान मसाला, गुटखा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

तपासणीत वाहनातून 11,600 पॅकेट प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा साठा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत रु. 19,19,000 असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी वाहन चालक संजयकुमार किशोरीलाल गुप्ता (रा. रेती फाटक, लोहामंडी, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संयुक्त कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने (नाशिक), सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, अरविंद राऊत, मंगेश भावसार (अन्न व औषध प्रशासन, धुळे) तसेच सांगवी पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे पीएसआय हेमंत खैरनार  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

error: Content is protected !!