Homeताज्या बातम्याशिरपूर तालुक्यात पोलिस वाहनाचा भीषण अपघात; १ पोलीस अंमलदार ठार, २ जखमी

शिरपूर तालुक्यात पोलिस वाहनाचा भीषण अपघात; १ पोलीस अंमलदार ठार, २ जखमी

धुळे : शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर दहिवद गावाजवळ पोलिस वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला असून इतर दोघे अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघात कसा घडला?

महामार्ग वाहतूक शाखा, शिरपूर यांचे बोलेरो वाहन (क्रमांक MH18 BX 0232) सोमवारी सकाळी गस्तीसाठी जात होते. अचानक गाडीचा मागील टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले व बोलेरो महामार्गावर पलटी झाली. वाहन पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले.

मृत्यू व जखमींची माहिती

या अपघातात तीन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले.

नवल नवल सिंग  वसावे

प्रकाश जाधव

अनिल पारधी

जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना पोलीस अंमलदार नवल वसावे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शिरपूर तालुका पोलीस ठाणे व संपूर्ण पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. उर्वरित दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांची वाहने सुरक्षित व सक्षम असायला हवीत, असा जनतेचा विश्वास असतो. मात्र या घटनेत पोलिस वाहनाचा टायर फुटून अपघात झाल्याने वाहनांच्या देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अशा त्रुटींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

तपास सुरू

दरम्यान, शिरपूर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!