Homeमहत्त्वाचेशिरपूर तालुक्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! ‘आ. अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र’...

शिरपूर तालुक्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! ‘आ. अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र’ मार्फत १५ मार्च रोजी भव्य पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर व निवड चाचणी

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून “आ. अमरिशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र” मार्फत दि. १५ मार्च २०२६ रोजी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर व निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस दलात प्रवेश करण्यासाठी सक्षम मार्गदर्शन मिळणार आहे.

हे प्रशिक्षण आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर दि. १५ मार्च रोजी सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये पोलीस भरतीसह वनरक्षक भरती, एसएससी जीडी भरती, रेल्वे भरती आणि अग्निवीर भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठीही विशेष मार्गदर्शन व शारीरिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून उमेदवारांना शारीरिक चाचणी, धाव, व्यायाम, तसेच भरती प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी 98902 92230 किंवा 91129 16776 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एस.व्ही.के.एम.चे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा आणि एस.व्ही.के.एम. सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे शिरपूर तालुक्यातील युवक-युवतींसाठी ही प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांचा अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून असंख्य मुलामुलींची विविध सरकारी सेवांमध्ये निवड झाली असून अनेकांना नोकरीची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी भरती प्रक्रियेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शिरपूर तालुक्यातील इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!