शिरपूर : “गुणवत्तापूर्ण शिक्षण ते आरोग्य, स्वच्छता ते पर्यावरण — सर्वच क्षेत्रात ‘शिरपूर पॅटर्न’ देशभरात आदर्श ठरणार आहे. शिरपूरला देशातील नामांकित शहराचा दर्जा मिळवून आणण्याचा आमचा दृढ संकल्प आहे,” असे उद्गार माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी चौधरी गल्लीतील भव्य सभेत काढले.
शिरपूर-वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई अमरिशभाई पटेल व सर्व ३२ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ काल (दि. २७ नोव्हेंबर) ही विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
शिरपूर पॅटर्न — देशासाठी एक प्रेरणादायी मॉडेल
अमरिशभाईंनी विकासाचा मागोवा घेत सांगितले की,गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली स्वच्छ पिण्याचे पाणीपर्यावरण व हरितक्रांती आरोग्य सुविधा सांडपाणी व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत शिरपूरने गेल्या दशकांत तयार केलेला पॅटर्न आता देशभर अनुकरणीय ठरणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
“शहराच्या विकासासाठी गेली ४० वर्षे आम्ही मनापासून काम केले आहे. पुढील ३० वर्षे लक्षात घेऊन आता आणखी मोठी उडी घेणार आहोत,” असे ते म्हणाले.
भाजप उमेदवारांना भरघोस मतांचे आवाहन
अमरिशभाईंनी शिरपूरच्या नागरिकांना आवाहन करताना सांगितले : “चिंतनभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांसह सर्व ३२ उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. सत्ताधारी भाजपसोबत राहिल्याने शहराला कोट्यवधींचा निधी मिळाला आहे आणि पुढेही विकासाची गती अशीच वाढत राहील.”
रोजगार व जनसेवा — पटेल परिवाराचा मजबूत पाया
सभेत विकासाचा तपशील सादर करताना त्यांनी सांगितले की —135 युवक-युवतींना नोकरीचे संधीकरण2,35,000 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड47,000 नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वितरण43,000 जणांना संजय गांधी-श्रावणबाळ योजना75,000 बांधकाम कामगारांना योजना लाभतब्बल 1,10,000 महिलांना लाडकी बहीण योजना“हे सर्व काम मोफत, पारदर्शक आणि जनतेच्या हितासाठी!” — अमरिशभाई पटेल‘१ हजार बेड्स’चे अत्याधुनिक हॉस्पिटल — शिरपूरचा आरोग्य क्रांतीकडे टप्पा
अमरिशभाईंनी जाहीर केले की, जागतिक दर्जाची मशीनरी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कमी खर्चात उच्च दर्जाची आरोग्य सुविधायासाठी १,००० बेड क्षमतेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
‘नवे शिरपूर’ — 600 एकरमध्ये विस्तार
वरझडी रस्त्यावर 400 ते 600 एकर क्षेत्रावर नव्या शिरपूर नगरीचा विस्तार करण्याची भव्य संकल्पना त्यांनी मांडली — “शहराला भविष्यकालीन स्वरूप देणे हेच आमचे ध्येय आहे.”
नेत्यांचे मार्गदर्शन आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभागया सभेला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर — अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, दिलीप लोहार, खुशाल चौधरी, बाजार समिती सभापती के.डी. पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी आणि सर्व उमेदवार आदींची उपस्थिती होती.आमदार काशिराम पावरा म्हणाले — “शिरपूरचा विकास हा फक्त पटेल परिवारामुळे शक्य झाला. शहराला पर्यायच नाही, कारण शिरपूर पाठीशी मजबूत नेतृत्व उभे आहे.”सुभाष कुलकर्णी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.शिरपूरच्या उज्ज्वल भविष्याचा ठसा उमटवणारी सभा!या सभेने शिरपूरच्या आगामी विकासदिशेचा स्पष्ट रोडमॅप मांडत नागरिकांच्या अपेक्षांना नवी ऊर्जा दिली. भाजपाच्या प्रचारयात्रेला या सभेमुळे जबरदस्त गती मिळाली असून पुढील काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येणार आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















