Homeताज्या बातम्याशिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ...

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो गांजा नष्ट; दुर्गम डोंगराळ भागात धडक कारवाई! शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गांजा लागवडीवर पोलिसांचा छापा

शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गम डोंगराळ भागात छापा टाकून सुमारे ७ कोटी ६७ लाख रुपये किमतीची ३,०६८ किलो वजनाची गांजाची उभी पिके शोधून काढली. घटनास्थळीच ही पिके नष्ट करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव दोंदवाडा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित कॅनाबिस वनस्पतीची (गांजा) बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील कक्ष क्रमांक १००८, नियतक्षेत्र महादेव दोंदवाडा येथे कारवाई केली.

या परिसरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड आढळून आली. कारवाईदरम्यान राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वनपरिक्षेत्रीय अधिकारी, वजनकाटाधारक, छायाचित्रकार आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत पंचनामा व आवश्यक प्रक्रिया करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच ठिकाणांवरील गांजाच्या उभ्या पिकांचे एकूण वजन ३,०६८ किलो असल्याचे आणि त्यांची अंदाजित किंमत ७ कोटी ६७ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गांजाची पिके अतिदुर्गम डोंगराळ भागात असल्याने घटनास्थळी वाहने नेणे शक्य नव्हते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यातील कलम ४८ मधील तरतुदीनुसार गांजाची झाडे उपटून वेगवेगळे ढीग करण्यात आले आणि घटनास्थळीच जाळून नष्ट करण्यात आली.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(अ)(i) आणि २८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेकायदेशीर लागवडीमागे कोण व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.

ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, वनपरिक्षेत्रीय अधिकारी कैलास सोनवणे (वन्यजीव, शिरपूर), पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच पोलीस अंमलदार संजय चव्हाण, मोहन पाटील, राजू ढिसले, संदीप ठटाकरे, जाकिरोद्दीन शेख, दिनेश सोनवणे, रोहिदास पावरा, संजय भोई, भूषण पाटील, सुनील पवार, गिरधर पाटील आणि होमगार्ड मोतीलाल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.महादेव दोंदवाडा परिसरातील या कारवाईमुळे दुर्गम वनक्षेत्रात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गांजा लागवडीचा मोठा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संबंधितांचा शोध घेणे आणि बेकायदेशीर लागवडीचे संपूर्ण जाळे उघडकीस आणणे हे आता तपासातील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; ५.७७ कोटींची गांजासदृश अंमली...

  शिरपूर | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध गांजा लागवडीविरोधात अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या कारवाया झाल्याने परिसरातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

error: Content is protected !!