प्रतिनिधी।धुळे
धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या 2 अधिकारी आणि 1 कर्मचाऱ्यांस निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रकरणातील एका निवृत्त अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीडित महिलेचा वरिष्ठ अधिकारी कडून लैंगिक छळ होत असल्याने महिला कर्मचारी ने तक्रार केली होती.या तक्रार च्या अनुषंगाने अंतर्गत चौकशी समितीने चौकशी करून अहवाल आयुक्त कार्यालयात सादर केला होता.वरिष्ठ दुययम निरीक्षक ए. व्ही.भंडागे, निरीक्षक आर. आर. धनवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके यांच्यावर अश्लिल शेरेबाजी, मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते…
या गंभीर तक्रारीनंतर अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती. यानंतर समिती मार्फत अनेक तासांच्या बैठका घेत ऑडिओ क्लिप्ससह विविध तांत्रिक आणि इतर पुराव्यांची तपासणी करण्यात आली… समितीने चौकशीचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे सादर केला… अहवालातील निष्कर्ष आणि पुरावे विचारात घेऊन आयुक्तांनी कारवाईचे थेट आदेश देत ए. व्ही. भडागे, जे. बी. फुलपगारे आणि गौरव सपके यांना निलंबित करण्यात आलंय… तर आर. आर. धनवटे हे सेवानिवृत्त असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. सततच्या मानसिक त्रासामुळे खचलेल्या या महिला कर्मचाऱ्याने अन्याया विरोधात लढा उभारला आणि अखेर तिच्या तक्रारीवर चौकशी होऊन दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
धुळ्यातील या कारवाईमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला असल्याचे आता बोलले जात आहे.
राज्यात सर्वात मोठी कारवाई-
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार अधिनियम 2013 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.एकाच वेळेस चार अधिकारी कर्मचारी वर कारवाई ने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदर्श घालून दिला आहे. दरम्यान निडरपणे लढणाऱ्या महिला कर्मचारी याचे देखील कौतुक होत आहे. त्याच्या धाडस मुळे या पुढे अत्याचार करणाऱ्या च्या मनात धाक निर्माण होणार आह

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















