Homeताज्या बातम्याखत वितरणात गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! नियमांचे काटेकोर पालन करा...

खत वितरणात गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! नियमांचे काटेकोर पालन करा – गुणवत्ता निरीक्षक विशाल मोटे यांचा इशारा

शिरपूर
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासन सज्ज झाले असून खत वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विशाल मोटे यांनी दिला.
शिरपूर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीपपूर्व नियोजन बैठक व साथी पोर्टल संदर्भातील प्रशिक्षण पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना मोटे बोलत होते.
खत वितरणात पारदर्शकता आणि शिस्त राखण्यावर भर देत त्यांनी स्पष्ट केले की, खते विक्री करताना ई-पॉस मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच तालुक्यासाठी उपलब्ध होणारा खतसाठा तालुक्यातच विक्री करणे आवश्यक असून, शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसारच खत विक्री केली जावी.
युरियाच्या अनियंत्रित वापरावर लगाम घालण्यासाठी प्रति शेतकरी २० पेक्षा जास्त बॅग विक्री झाल्यास तपासणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. खतसाठ्याची मोजणी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच करणे बंधनकारक राहणार असून, शेतकऱ्यांसाठी असलेला साठा इतर औद्योगिक वापरासाठी वळवू नये, यावर प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे.
जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मोटे यांनी विक्रेत्यांनी केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना योग्य कृषी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ यांनीही विक्रेत्यांनी नियमांचे पालन करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले.
या बैठकीस शिरपूर तालुका सीड्स, पेस्टिसाइड व फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत चौधरी, उपाध्यक्ष गौरव गोयल, सचिव भूपेश अग्रवाल, खजिनदार निलेश अग्रवाल यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!