Homeमहत्त्वाचेगुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात धुळे पोलिसांना मिळाले अत्याधुनिक शस्त्र – मोबाईल फॉरेन्सिक...

गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात धुळे पोलिसांना मिळाले अत्याधुनिक शस्त्र – मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन

धुळे :गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता धुळे पोलिसांच्या हाती अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. शासनाकडून धुळे जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन (फिरती न्यायवैद्यक प्रयोगशाळा) देण्यात आली असून याचा वापर करण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बुधवारी परवानगी दिली. प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात या व्हॅनचे अनावरण करण्यात आले.

ब्लॉकचेन आणि AI चा वापर

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे आता पोलिसांना घटनास्थळीच जाऊन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून तपास करता येणार आहे. “क्राईम सीन अ‍ॅप्लिकेशन” च्या मदतीने गुन्ह्यांची संपूर्ण नोंद घटनास्थळीच करता येईल. मिळालेल्या पुराव्यांचे बारकोडद्वारे नोंदणी करून ते सीसीटीव्ही देखरेखीखाली सुरक्षित ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची किंवा छेडछाड होण्याची शक्यता संपुष्टात येईल.

महत्त्वाचे तपास साहित्य उपलब्ध

या व्हॅनमध्ये रक्त व डीएनए नमुने गोळा करण्याची सुविधा असून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करता येईल. तसेच, स्फोटक पदार्थांची तपासणी, सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर यासाठी आवश्यक साहित्यही यात बसविण्यात आले आहे.

प्रगत सुविधा आणि थेट समन्वय

मोबाईल व्हॅनमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. त्यामुळे घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांची माहिती लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देता येईल. आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तज्ज्ञांशी थेट चर्चा करून तपास अधिक परिणामकारक बनवता येईल.

अधिकाऱ्यांचे मत

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, “मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधता येईल. त्यामुळे संशयित गुन्हेगारांना वाचणे जवळपास अशक्य होईल.”

गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनीही सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे संशयितांना सहज सुटता येणार नाही, कारण तपासणीदरम्यान मिळणारे पुरावे अत्यंत ठोस आणि अचूक असतील.

नवीन बससह सुविधा वाढ

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांना आणखी दोन आधुनिक २२ आसनी बसही देण्यात आल्या आहेत. या बसचीही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाहणी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!