Homeमहत्त्वाचेधावत्या टँकरला अचानक आग; महामार्गावर एकच खळबळ, वाहनांची प्रचंड कोंडी

धावत्या टँकरला अचानक आग; महामार्गावर एकच खळबळ, वाहनांची प्रचंड कोंडी

धुळे (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील नगाव परिसरात, हॉटेल राजधानीजवळ आज धावत्या टँकरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. हा टँकर शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना अचानक टँकरच्या कॅबिनने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीचे लोट दूरवरून दिसू लागल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक वाहनचालकांनी आपली वाहने थांबवल्याने महामार्गावर मोठी वाहन कोंडी झाली. काही काळासाठी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र टँकरचे कॅबिन मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे.

या टँकरला नेमकी कशामुळे आग लागली, तसेच टँकरमध्ये नेमके कोणते साहित्य होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, आगीचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास केला जाणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्रशासनाने वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!