Homeक्राईम धुळे नगर भूसंपादन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कारनामा उघड – बनावट नकाशा व दस्तावेजाच्या...

 धुळे नगर भूसंपादन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कारनामा उघड – बनावट नकाशा व दस्तावेजाच्या आधारे मालमत्तेची विक्री, चौघांना अटक

धुळे, शहरातील स्वस्तिक चित्रपटगृहाशी संबंधित मालमत्तेच्या दस्तावेजांमध्ये छेडछाड करून आणि बनावट नकाश्याचा वापर करून बेकायदेशीररित्या वारस नोंदवून खरेदीखताद्वारे मालमत्ता विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगर भूसंपादन कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात हिरालाल शाह यांच्या नावासोबत दस्तावेजामध्ये असलेला कंस हटवून, प्रदीप शाह यांना मालमत्तेवर कारणापुरता उतारा देण्यात आला. या बनावट उताऱ्यावरून प्रदीप शाह यांच्या नावाने वारस म्हणून नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, यासाठी बनावट नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले होते.

धुळे शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आनंद मोरे (डाटा एन्ट्री ऑपरेटर), धमेंद्र खंबाईत (परिरक्षण भूमापक), देवेंद्र टोपे (प्रमुख लिपीक) आणि धिरज बोरसे (लिपीक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अमोल देवढे, सविता गवांदे, रवींद्र माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार आणि विलास पाटील यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!