Homeक्राईमशिरपूरमध्ये घरफोडीचा पर्दाफाश: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

शिरपूरमध्ये घरफोडीचा पर्दाफाश: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

शिरपूर शहरातील टेकवाडे येथील प्रवीण पोपट वाडीले यांच्या घरात झालेल्या घरफोडीचा शिरपूर शहर पोलिसांनी यशस्वीपणे तपास लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ४०,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली असून, एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पोलीस कोठडी रिमांड मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे.
प्रवीण पोपट वाडीले (वय ४०, रा. टेकवाडे) हे ५ नोव्हेंबर २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्या कुटुंबासह कोपली, जि. नंदुरबार येथे गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून ३६,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३५,०००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.५ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की, टेकवाडे गावातील एक व्यक्ती चोरीचे दागिने विकण्यासाठी शिरपूर येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील सराफ बाजारात सापळा रचला. संशयित दीपक रमेश कोळी (वय ३६, रा. टेकवाडे) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्या खिशातून १६,०००/- रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि १४,०००/- रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट सापडले. चौकशी केली असता, त्याने प्रवीण वाडीले यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करत आहेत.

सदरची कारवाई यांनी केली मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी आणि डी.बी. पथकातील पोहेकॉ. राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, पवन इशी, मनोज पाटील, पो.कॉ. योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरिफ तडवी, सोमा ठाकरे आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून कारवाई करण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!