Homeताज्या बातम्यानिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांचा कडक बंदोबस्त 24×7 सोशल मीडिया पेट्रोलिंग...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांचा कडक बंदोबस्त 24×7 सोशल मीडिया पेट्रोलिंग सुरू; अफवा पसरवल्यास तातडीची कारवाई**

धुळे : आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोशल मीडियाद्वारे अफवा, दिशाभूल, जातीय तेढ किंवा धार्मिक भावना भडकवण्याचे प्रकार वाढू नयेत म्हणून धुळे जिल्हा पोलिसांनी डिजिटल पातळीवर कडक मोहीम राबवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 24×7 सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असून कोणतीही अनुचित, भडकावू किंवा लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारी पोस्ट आढळल्यास त्वरित कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशन, धुळे यांनी दिली.

पोलीस अधीक्षकांचे निर्देश – ‘अफवा पसरवणाऱ्यांना कुठलीही सूट नाही’

जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी सायबर पोलिसांना निवडणूक काळात सोशल मीडियावर सातत्याने नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सोशल मीडिया पथक स्थापन करण्यात आले आहे.

चार पथकांची रात्रंदिवस नजर

सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अधिकारी आणि 12 अंमलदारांचे एकूण 4 सोशल मीडिया पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांकडून फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब, व्हॉट्सअॅप तसेच इतर सर्व प्लॅटफॉर्मवर सातत्याने निगराणी ठेवली जात आहे.

या पथकांचे कामकाज :

चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारे पोस्ट शोधणे

धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारी सामग्री ओळखणे

राजकीय स्पर्धेला हवा देणारे किंवा लोकशाहीला बाधा आणणारे व्हिडीओ/मीम्स शोधणे

द्वेषपूर्ण भाषण, धमक्या किंवा बदनामीकारक मजकुराचा शोध

अफवेचा प्रसार करणाऱ्या अकाउंट्सची त्वरित ओळख

या कलमान्वये होईल कडक कारवाई

सोशल मीडियावर चुकीची किंवा उत्तेजक सामग्री पोस्ट करणाऱ्यांवर खालील भारतीय न्याय संहिता (BNS) कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील :

कलम 197 : राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या पोस्टवर कारवाई

कलम 196 : दोन समाजात तेढ निर्माण करणारी सामग्री

कलम 298 : धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट

कलम 353(2) : खोटी विधाने किंवा अफवा पसरवून शत्रुत्व निर्माण करणे

याशिवाय आयटी अॅक्ट व इतर संबंधित कायद्यांनुसार देखील कारवाई होऊ शकते.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

पोलीस अधीक्षकांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, निवडणूक काळात जबाबदारीने सोशल मीडिया वापरावा. अफवा, चुकीची माहिती, धमकी, बदनामीकारक मजकूर किंवा सांप्रदायिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टपासून दूर राहावे. असे कृत्य करणाऱ्या कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुट मिळणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सायबर पोलिसांच्या या सतर्कतेमुळे निवडणुकीदरम्यान धुळे जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!