Homeताज्या बातम्याबेकायदेशीर गॅसपंप उद्धवस्त धुळे एलसीबीचा छापा, एक जण ताब्यात तर दुसरा...

बेकायदेशीर गॅसपंप उद्धवस्त धुळे एलसीबीचा छापा, एक जण ताब्यात तर दुसरा फरार

शिरपूर शहरातील वरवाडे परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या साहाय्याने वाहनांना गॅस भरण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी सकाळी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत मिनी गॅसपंप उद्धवस्त करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई राबविण्यात आली. एलसीबीचे पथक वरवाडे परिसरात पोहोचले असता, तेथे घरगुती गॅस सिलेंडरद्वारे वाहनांना गॅस भरण्याचे बेकायदेशीर काम सुरू असल्याचे उघड झाले.पोलिसांनी छापा टाकून गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर, नोझल व इतर साहित्य असा एकूण ₹18,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात एक संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

या कारवाईनंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर गॅसपंपांवर धाक निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!