Homeताज्या बातम्याविविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकर्‍यांचे निवेदन

विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकर्‍यांचे निवेदन

शिरपूर युरिया  व डीएपी खतांचा तुटवडा दूर करावा, अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्‍यांना कर्जे मिळवून देण्यास सहकार्य करावे, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्या देणे बंधनकारक करावे आदि मागण्यांसाठी बिरसा आर्मी व आदिवासी शेतकर्‍यांनी 14 जुलैला प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देऊन बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
बिरसा आर्मीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पावरा व शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील युरिया, डीएपी 10:26:26 खतांची टंचाई दूर करावी, या खतांसोबत लिंकिंगच्या माध्यमातून दुय्यम खते घेण्याची सक्ती केली जात असून हा प्रकार बंद करावा, शासनाचे स्पष्ट आदेश असतांनाही अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्‍यांना पीककर्जे देण्यास बँका टाळाटाळ करीत असून संबंधित अधिकार्‍यांना समज देण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर शिधापत्रिका धारकांना पावती न देण्याचे प्रकार सुरु असून अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करावेत, सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, नव्या शिधापत्रिका मागणीनुसार द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास बैलगाडी मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी मनोज पावरा, सुरेश पावरा, अशोक भिल, सरदार पावरा, काकड्या पावरा, कैलास पावरा, किस्मत पावरा, सुरेश ठाणसिंह पावरा, कैलास काकड्या पावरा आदि उपस्थित होते. युरियासंदर्भातील मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!