Homeराजकीयशिरपूर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांची धडक मोहीम! पावसाळ्यातील साथीच्या...

शिरपूर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांची धडक मोहीम! पावसाळ्यातील साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरभर स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी; नागरिकांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त ठेवण्याचा निर्धार करत लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. चिंतनभाई पटेल यांनी स्वच्छता मोहिमेला अधिक वेग दिला आहे. केवळ आदेश देण्यापुरते न थांबता ते स्वतः शहरातील विविध भागात जाऊन स्वच्छतेच्या कामांची पाहणी करत असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देत आहेत.

आज नगराध्यक्षांनी करवंद नाका, शहादा रोड, स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि बालाजी नगर या भागांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील स्वच्छतेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.

सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने शहरातील नाले, गटारे, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या या सक्रिय आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “स्वच्छ शिरपूर – निरोगी शिरपूर” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्रितपणे काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

“स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन करत नगराध्यक्षांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शिरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!