Homeताज्या बातम्यासरपंच मृत्यू प्रकरण तापले; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिरपूर पोलीस ठाण्यात ठिय्या...

सरपंच मृत्यू प्रकरण तापले; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिरपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील बलकुवे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणाने तालुक्यात तीव्र खळबळ उडाली असून, या मृत्यूस जबाबदार असलेल्या माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या ठाम मागणीसाठी ग्रामस्थांसह शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, माहिती अधिकाराच्या माध्यमातून सातत्याने तक्रारी, चौकशी व नोटिसा लावून सरपंच प्रदीप चव्हाण यांना मानसिक छळ करण्यात आला. या अखंड तणावामुळेच त्यांचा मृत्यू झाला असून, ही बाब सदोष मनुष्यवध या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मोडते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित RTI कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण

दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनामुळे शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी, संतप्त प्रतिक्रिया आणि ठाम भूमिका यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.

पोलीस-आंदोलक संवादानंतर आंदोलन मागे

पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून कायदेशीर प्रक्रिया, चौकशीची दिशा आणि पुढील कार्यवाहीची माहिती दिली. मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास आवश्यक असून, सर्व बाबींचा कायद्याच्या चौकटीत विचार केला जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी कायम

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!