Homeक्राईमडंपरचोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एक कोटी १० लाखांची...

डंपरचोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एक कोटी १० लाखांची वाहने जप्त

शिरपूर, शहरात घडलेल्या डंपर चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत शिरपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय पातळीवर धाडसी व कौशल्यपूर्ण कारवाई केली आहे. चोरट्यांचा पाठलाग करत थेट राजस्थान राज्यात पोहोचलेल्या पोलिसांनी डंपरचोरांच्या टोळीतील चार संशयितांना अटक करत दोन डंपर व एक कार असा तब्बल एक कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूरला भेट देऊन पथकाचे विशेष कौतुक केले.चोरीची घटना व तपासाची दिशा शिरपुर शहरातील प्रदीप चौधरी व अमन कटारिया यांच्या मालकीचे दोन डंपर ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.सीसीटीव्ही फुटेज, पेट्रोल पंपांवरील नोंदी तसेच टोल नाक्यांवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश ते राजस्थान असा सखोल तपास करत चोरट्यांचा माग काढला. अखेर तपासाची दिशा भिलवाडा जिल्ह्याकडे वळली.

राजस्थानमध्ये धडक कारवाई पूर (जि. भिलवाडा) येथील सायबर पोलिस ठाण्यातील हवालदार चंद्रपालसिंह यांच्या मदतीने शिरपूर पोलिसांनी संशयितांचा ठावठिकाणा निश्चित केला. भिलवाडा येथील दुर्गम भागात दडवून ठेवलेले डंपर शोधून काढत पोलिसांनीइरफान उस्मान मेव (वय ४०, रा. बडका, ता. नूह),नियामत दिनू मेव (वय ३४, रा. हातीन, जि. पलवल),कालू गफूरखान मेव (वय ५०)आणि महावीर प्रसाद भवनलाल शर्मा (वय ५०, रा. भिलवाडा)यांना अटक केली.जप्त मुद्देमाल

पोलिसांनी या कारवाईत

टाटा कंपनीचा सिग्ना डंपर (MH 18 BZ 5114),डंपर (MH 18 BH 1718)मारुती सुझुकी बॅलेनो कार (HR 52 G 7875)असा एकूण एक कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.न्यायालयीन प्रक्रियाअटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिस पथकाचे कौतुक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक किशोरकुमार परदेशी तसेच शोध पथकातील हवालदार रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, प्रशांत पवार, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ यांनी अथक परिश्रम घेत ही कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!