Homeक्राईमशिरपूर पोलिसांची धडक कारवाई; १ कोटी १० लाखांचे हायवा चोरणारी आंतरराज्यीय टोळी...

शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; १ कोटी १० लाखांचे हायवा चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद राजस्थान–हरियाणातून चौघांना बेड्या; दोन हायवा व कारसह मुद्देमाल जप्त

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर शहरात घडलेल्या मोठ्या वाहनचोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत शिरपूर शहर पोलीस यांनी आंतरराज्यीय हायवा चोर टोळीवर जोरदार घाव घातला आहे. तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचे दोन टाटा सिग्ना हायवा डंपर चोरीला गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी थेट राजस्थान व हरियाणा गाठत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली.

दिनांक ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिरपूर शहरातून हे दोन हायवा डंपर चोरीला गेले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून किशोरकुमार परदेशी यांनी तातडीने विशेष तपास पथके रवाना केली. शिरपूरपासून राजस्थानातील भिलवाडापर्यंतच्या महामार्गांवरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.

स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने सापळा रचत हरियाणा व राजस्थान येथे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून चोरीचे दोन्ही हायवा डंपर व गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा एकूण १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही संपूर्ण धाडसी कारवाई श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. शिरपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना जोरदार इशारा मिळाला असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. शिरपूर पोलिसांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक किशोरकुमार परदेशी तसेच शोध पथकातील हवालदार रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, प्रशांत पवार, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ यांनी अथक परिश्रम घेत ही कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!