Homeराजकीयशिरपूर नगरपरिषदेच्या स्ट्राँग रूमला कडेकोट सुरक्षा; ७५ मतपेट्या पोलिसांच्या विशेष निगराणीत

शिरपूर नगरपरिषदेच्या स्ट्राँग रूमला कडेकोट सुरक्षा; ७५ मतपेट्या पोलिसांच्या विशेष निगराणीत

शिरपूर │ प्रतिनिधी

शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी ०२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर सिलबंद करण्यात आलेल्या ७५ EVM मतपेट्या आता शिरपूर शहरातील मुकेशभाई पटेल टाऊन हॉल, करवंद नाका येथे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात आल्या आहेत. आगामी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत या मतपेट्यांचे संरक्षण हे पोलिस व प्रशासनासाठी सर्वोच्च प्राधान्याचे ठरले आहे.

पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त — एक क्षणही ढिलाई नाही

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी शिरपूर पोलिस प्रशासनाने व्यापक आणि अभेद्य अशा सुरक्षा जाळ्याची उभारणी केली आहे.१ पीएसआय दर्जाचा अधिकारी १२ पोलीस कर्मचारी हे सर्व अधिकारी व कर्मचारी २४ तासांच्या ड्युटीवर तैनात असून, कोणत्याही संशयास्पद हालचालीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत. परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काटेकोर नोंद ठेवली जात आहे.

१६ CCTV कॅमेऱ्यांचे सतत निरीक्षण — स्ट्राँग रूम एक मिनिटही नजरेआड नाही

मतपेट्यांच्या सुरक्षेला तांत्रिक बळ देण्यासाठी प्रशासनाने एकूण १६ उच्च-गुणवत्तेचे CCTV कॅमेरे बसवले आहेत.कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण कंट्रोल रूममधील LED स्क्रीनवर पाहण्यासाठी सुविधातळ मजल्यावरील कार्यालयाबाहेर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र LED स्क्रीन यामुळे उमेदवारांना पूर्ण पारदर्शकतेने स्ट्राँग रूमवरील हालचाली पाहण्याची संधी मिळत आहे. या व्यवस्थेमुळे कुठलाही गैरसमज, शंका किंवा अफवा निर्माण होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.

प्रशासनाची तिहेरी पाळी — २४ तास दक्षता

फक्त पोलिसांच नव्हे तर प्रशासनाचा देखील स्ट्राँग रूमवर तितकाच कणा आहे.वर्ग दोनचे जबाबदार अधिकारी८–८ तासांच्या शिफ्टमध्ये २४ तास उपस्थित ही तिहेरी पाळीची व्यवस्था स्ट्राँग रूमची सुरक्षा अधिक भक्कम बनवते. मतदान पेट्या सुरक्षित ठेवण्याच्या कामात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून प्रशासन पूर्ण दक्षतेने कार्यरत आहे.

मतमोजणीपूर्वीची सज्जता — सुरक्षा व्यवस्थेवर उमेदवार व जनतेचा विश्वास

कडेकोट बंदोबस्त, सातत्याने होणारे CCTV निरीक्षण, पोलिसांची सततची तैनाती आणि प्रशासनाची काटेकोर जबाबदारी पाहता शहरातील उमेदवार, प्रतिनिधी तसेच मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सुरक्षा यंत्रणेने उभारलेली व्यवस्था पाहता शिरपूर नगरपरिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता राहील, असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. निवडणूक सहायक अधिकारी मा प्रशांत शिरोदे सरांनी म्हटला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!