Homeराजकीय*शिरपूरकरांच्या नागरी हक्कांसाठी शिवसेनेची कटीबद्ध लढाई! खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत...

*शिरपूरकरांच्या नागरी हक्कांसाठी शिवसेनेची कटीबद्ध लढाई! खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पाच कंदील परिसरात शिवसेनेची विराट शक्ती-सभा**

प्रतिनिधी / शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापत असताना, शिवसेना शिंदे गटाने बुधवारी (दि. 27) पाच कंदील परिसरात आयोजित केलेल्या विराट शक्ती-सभेने प्रचंड ताकद दाखवत निवडणुकीचे चित्रच पालटून टाकले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांमुळे संपूर्ण परिसर भगवे दुपट्टे, घोषणाबाजी आणि उत्साहाने दुमदुमून गेला.

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील तसेच नगरसेवक पदासाठीचे अधिकृत उमेदवार व पुरस्कृत अपक्ष यांच्या समर्थनासाठी झालेल्या या सभेला युवासेना प्रमुख व खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष सतीश महाले, शिवसेना नेते डॉ. जितेंद्र ठाकूर, मनू दादा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग हा सभेचा लक्षवेधी मुद्दा ठरला.

हेमंत पाटील यांचे मनाला भिडणारे भाषण : “शिरपूरच्या स्वाभिमानासाठी हा लढा”

शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी मनाला भिडणारे भाषण करत जनतेच्या भावनांना हात घातला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—

“आमच्या तीन पिढ्यांनी ज्या पक्षासाठी रक्त घाम गाळला, त्याच पक्षातून निर्माण झालेल्या अन्याय, घराणेशाही, दडपशाही आणि हुकूमशाही सहन न झाल्याने आम्ही स्वाभिमानासाठी हा लढा उभा केला आहे.”

त्यांनी शहरातील महत्त्वाच्या प्रलंबित समस्या अधोरेखित केल्या— • वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी • हटवादी करप्रणाली • व्यापाऱ्यांवर लादलेले जादा दुकानभाडे • अतिक्रमित वस्त्यांचे प्रश्न • अव्यवस्थित पायाभूत सुविधांचे प्रश्न

या सर्व विषयांवर त्वरित तोडगा काढावा यासाठी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठोस मागण्या केल्याचे सांगितले.

डॉ. जितेंद्र ठाकूर यांचे भावनिक आणि रोखठोक भाषण

स्वाभिमानी लढाऊ नेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या अनुभवातून मनातली खदखद मांडली. त्यांनी पूर्वी राजकीय पक्षांकडून न मिळालेल्या सहकार्यामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य करत स्पष्ट केले—

“माझ्यासारखा अनुभव या सहकाऱ्यांना येऊ नये. शिरपूरच्या स्वाभिमानी लढवय्यांना शिवसेना खऱ्या अर्थाने साथ देईल.”

शिरपूर तालुक्यात दाखवला जाणारा विकास हा स्थानिक जनतेचा नसून निवडक राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी झाल्याचे त्यांनी थेट शब्दांत सांगितले. त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

मंत्री दादा भुसे यांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक इशारा

मंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या खास शैलीत अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला—“शिवसेनेचा सरकारवर प्रभाव आहे. शिरपूरमध्ये कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय झाला, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईची तयारी ठेवावी लागेल.”तसेच तालुक्यातील सहकारी प्रकल्प सुरू ठेवणे, जनतेच्या समस्या त्वरित सोडवणे, आणि नागरिकांना न्याय देणे या बाबत त्यांनी स्पष्ट आश्वासने दिली.सभेचा उत्कर्षबिंदू : खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रभावी समारोप भाषण सभेचा मुख्य आकर्षण ठरले युवासेना प्रमुख व लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांचे दमदार भाषण. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत सांगितले—“

शिवसेना हा ‘मानूसकी’ला केंद्रस्थानी ठेवून काम करणारा पक्ष आहे. साध्या शेतकऱ्याच्या, गरीब माणसाच्या डोळ्यातील वेदना आम्हाला समजतात.”शिरपूरकरांना उद्देशून त्यांनी शक्तिशाली आवाहन केले—“तुम्ही अनेक वर्षे इतरांना संधी दिली. आता एकदा या स्वाभिमानी शिवसैनिकांना संधी द्या. घरपट्टी, पाणीपट्टी, दुकानभाडे, अतिक्रमण, स्थानिक प्रकल्पांचे प्रश्न—हे सर्व मुद्दे अल्पावधीत मार्गी लावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”त्यांच्या भाषणावर उपस्थितांकडून जोरदार घोषणाबाजी झाली आणि संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!