शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर सन २०२५-२०३० या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती (अनु. जाती) प्रवर्गासाठी चार ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भोरटेक रूदावली अंतुर्ली अर्थे बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर अनुसूचित जमाती (अनु. जमाती) प्रवर्गासाठी एकूण १४ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये थाळनेर, टेकवाडे, अर्थे खु., होळ, वाघाडी, बभळाज, भावेर, भटाणे, विखरण बु. अजनाड, गिधाडे, जापोरा, वनावल, टेंभे. बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
🔹 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६ ग्रामपंचायती
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (मागास प्रवर्ग) १६ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहिल्यापूर . चांदपूरी,. नवे भामपूर, . सुभाषनगर, . आढे . पिळोदे, . साकवद . वरुळ . आमोदा बलकुवे-मुखेड बोरगांव . नांथे . मांजरोद कळमसरे. कुवे . शिंगावे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
🔹 सर्वसाधारण प्रवर्गात ३४ ग्रामपंचायती
उर्वरित ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये . सावळदे, . भोरखेडा, लोंढरे, ताजपुरी, करवंद, . उंटावद, अजंदे खु., बाभुळदे, जवखेडा.अजंदे बु., .गरताड, . वाठोडे, . तरडी, . खर्दे खु. पाथर्डे, . घोडसगाव, . दहिवद. भाटपुरा. . मांडळ, खामखेडा प्र.था., . असली तांडे, जुने भामपुर, कुरखळी, जातोडे, . पिंपळे, सावेर गोदी, भरवाडे, तऱ्हाडी त.त., पिंप्री, . जैतपुर उप्परपिंड खदें बु हिंगोणी बु. बाळदे तोंदे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या सरपंच आरक्षण सोडतीची प्रक्रिया सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. आरक्षण जाहीर झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















