Homeसामाजिकबाळदे प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य यात्रा; ४४ वर्षांची अखंड...

बाळदे प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य यात्रा; ४४ वर्षांची अखंड परंपरा, हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील बाळदे प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी श्री पांडुरंगाची भव्य यात्रा उत्साहात भरत असून, यंदा या यात्रेचे ४४ वे वर्ष आहे. खान्देशासह मध्यप्रदेशातील विविध भागांतून हजारो वारकरी, भाविक आणि भक्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे येणार आहेत.

यात्रेनिमित्त श्री विठ्ठलधाम मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजता काकडा आरती व भजनाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सकाळी ७ वाजता नियमित आरती, तर सकाळी ७.३० वाजता शिरपूरचे आमदार श्री. काशिराम पावरा यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री पांडुरंगाची महापूजा संपन्न होणार आहे.

त्यानंतर सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, तसेच शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल हे श्री पांडुरंगाचे दर्शन घेणार असून यात्रेस उपस्थित राहणार आहेत.

यावेळी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, तसेच शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांचीही उपस्थिती राहणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी पोलीस व प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून अनेक वेळा प्रत्यक्ष पाहणी करून सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे.

भाविकांच्या सेवेसाठी अनिरुद्ध बाबा अकॅडमी, मुंबई (शिरपूर शाखा) येथील सुमारे २०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. तसेच शिरपूर व शिंदखेडा आगारातून भाविकांच्या सोयीसाठी जादा एसटी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यात्रेनिमित्त व्यावसायिकांसाठी मंदिर परिसरात प्रशस्त जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. पूजासाहित्य, नारळ, कुंकू, बुक्का, अष्टगंध, तुळशीमाळ, पालख्या, फराळ, गोड पदार्थ, पेढे तसेच इतर विविध वस्तूंच्या विक्रीसाठी शिस्तबद्ध पद्धतीने स्टॉल उभारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खान्देशातील चोपडा, शहादा, दोडाईचा, धुळे, नरडाणा, अमळनेर, शिंदखेडा तसेच मध्यप्रदेशातील पानसेमल येथून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाळदे येथे दाखल होणार आहेत.

सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ, तर रात्री ९ ते ११ वाजता प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. रामचंद्र महाराज मालपुर (दोडाईचा) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

या पवित्र यात्रेत सहभागी होऊन श्री पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष तथा माजी आमदार ह.भ.प. संभाजीराव पाटील, विश्वस्त ह.भ.प. जितेंद्र कुवर, ह.भ.प. दुष्यंत पाटील, ह.भ.प. निंबा पाटील, ग्रामस्थ मंडळी, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ आणि नवयुवक मंडळांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!