Homeसामाजिकशिरपूरमध्ये ‘माय होम शिरपूर फेस्टिव्हल 2026’ची धूम; खवय्ये, शॉपिंगप्रेमी आणि मुलांसाठी खास...

शिरपूरमध्ये ‘माय होम शिरपूर फेस्टिव्हल 2026’ची धूम; खवय्ये, शॉपिंगप्रेमी आणि मुलांसाठी खास पर्वणी

शिरपूर : शहरातील नागरिकांसाठी शॉपिंग, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची अनोखी मेजवानी घेऊन “माय होम शिरपूर फेस्टिव्हल 2026” हा भव्य महोत्सव लवकरच रंगणार आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल, शिरपूर यांच्या वतीने आयोजित हा बहुप्रतिक्षित फेस्टिव्हल 6 ते 9 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, शहरातील नागरिकांसाठी हा चार दिवसांचा आनंदोत्सव ठरणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये 100 हून अधिक स्टॉल्स, विविध प्रकारचे चविष्ट फूड स्टॉल्स, मनसोक्त शॉपिंग, गेम्स, स्पर्धा आणि भरपूर फुल एंटरटेनमेंटची रेलचेल असणार आहे. त्यामुळे शिरपूरकरांसह परिसरातील नागरिकांना खरेदी, खवय्येगिरी आणि कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

हा महोत्सव दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, खरेदी विक्री संघ पटांगण, टीएमसी शेडच्या शेजारी, शंकुतला लॉन समोर, शिरपूर येथे हा रंगतदार सोहळा पार पडणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये विविध व्यावसायिकांचे स्टॉल्स, आकर्षक ऑफर्स, लकी ड्रॉ, मनोरंजन कार्यक्रम तसेच मुलांसाठी खास गेम झोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खवय्ये, शॉपिंगप्रेमी आणि बालगोपाळांसाठी हा महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

या भव्य फेस्टिव्हलसाठी पुष्प ब्रँड, हिरो, आकाश, रायझिंग सोलार यांसारख्या विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. तसेच अनेक व्यावसायिक व शैक्षणिक भागीदारही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

लायन्स क्लब शिरपूरच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना या भव्य **“माय होम शिरपूर फेस्टिव्हल 2026”**ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

पुणे जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी केला आहे, कंपन्यांना कामगारांसाठी पंखे आणि विश्रांतीची...

पुणे: जिल्हा प्रशासनाने बुधवारी उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी करून उद्योग, कारखाने आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना कामगार आणि अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी, छायांकित विश्रांती...

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

error: Content is protected !!