Homeताज्या बातम्याशिरपूर तालुका पोलिसांचा धडाका; गांजाच्या शेतीचा भांडाफोड, ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त 

शिरपूर तालुका पोलिसांचा धडाका; गांजाच्या शेतीचा भांडाफोड, ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त 

शिरपूर (प्रतिनिधी):

शिरपूर तालुक्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी व धक्कादायक कारवाई करत गांजाच्या बेकायदेशीर शेतीचा पर्दाफाश केला आहे. महादेव दोंदवाडा गावाच्या शिवारात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ८२० किलो वजनाचा, सुमारे ४१ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, महादेव दोंदवाडा शिवारात एका शेतात प्रतिबंधित गांजाची लागवड करून त्याचे संगोपन व विक्रीसाठी तयारी सुरू आहे. सदर माहिती तात्काळ श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे यांना कळवून छापा कारवाईचे आदेश घेण्यात आले. शेतात पायी जाऊन थरारक छापापंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर व पोलीस पथकासह गावापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात व नाल्यातून पायी मार्ग काढत छापा टाकण्यात आला. तेथे फुले व बोंडे असलेली मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळून आली.

शेतात उपस्थित इसमाने आपले नाव राशा समदा पावरा (वय ५०) असल्याचे सांगत शेती स्वतःच्या मालकीची असल्याची कबुली दिली. ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त एकूण गांजा : ८२० किलोअंदाजे दर : ₹५,००० प्रति किलोएकूण किंमत : ₹४१,००,०००/-सदर गांजाची झाडे जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल, तपास सुरूया प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे विविध रित्या  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत. वरिष्ठांची घटनास्थळी भेटया गंभीर गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. ही कारवाई यांनी केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे श्रीअजय  देवरे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे व सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयपाल  हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनील वसावे, तसेच श्री. संतोष पाटील, जाकीरोद्दीन शेख, श्री. जगन्नाथ सोगनाथ कोळी, श्री. राजू दिसले, श्री. विजय डिवरे, श्री. स्वप्नील वसंत बांगर, श्री. दिनकर नारायण पवार, श्री. वाला पुरोहित, श्री. अल्ताफ बेग, श्री. उस्मान बेग मिर्झा तसेच श्री. इसरार फारुकी यांनी मोलाची भूमिका बजावली.यशस्वीरीत्या पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!