Homeमहत्त्वाचेसमाधान दिवस’ अभियानाची सुरुवात; महसूल सेवांसाठी नागरिकांना मोठा दिलासा

समाधान दिवस’ अभियानाची सुरुवात; महसूल सेवांसाठी नागरिकांना मोठा दिलासा

शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शिरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने ‘समाधान दिवस’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा असून नागरिकांच्या विविध महसूल विषयक समस्यांचे तात्काळ निवारण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित अनेक सेवा एकाच ठिकाणी आणि जलदगतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेषतः फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन अशा महत्त्वाच्या सेवांचा समावेश या शिबिरात करण्यात आला आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दप्तर वाटप, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, पाणी व रस्त्यांशी संबंधित प्रशासकीय मान्यता, ई-मोजणी अर्ज, पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादन आणि अकृषिक प्रकरणांबाबत मार्गदर्शन देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना महसूल कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मंडळनिहाय समाधान शिबिरांचे नियोजन

अर्थे – 09 मार्च 2026

कोडीद – 12 मार्च 2026

थाळनेर – 14 मार्च 2026

जवखेडा – 18 मार्च 2026

मिठोडे – 24 मार्च 2026

बोराडी – 08 एप्रिल 2026

सांगवी – 10 एप्रिल 2026

दहिवद – 14 एप्रिल 2026

करवंद – 16 एप्रिल 2026

शिरपूर – 02 मे 2026

होळनांदे – 14 मे 2026

हा उपक्रम तहसीलदार महेंद्र माळी आणि उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या महसूल विषयक समस्या, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जांसह ‘समाधान दिवस’ शिबिरात उपस्थित राहून त्वरित निवारण करून घ्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!