Homeमहत्त्वाचेधुळेकरांचा डीजे व लेझर लाईटविरोधात मुक रॅलीचे आयोजन २९ ऑगस्ट रोजी...

धुळेकरांचा डीजे व लेझर लाईटविरोधात मुक रॅलीचे आयोजन २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आयएमएतर्फे मूक रॅलीचे आयोजन

धुळे : शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविरोधात आता समाजातील सुजाण घटक रस्त्यावर उतरले आहेत. डीजे व लेझर लाईटच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालावी, या ठाम मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), धुळे शाखेच्या वतीने येत्या शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून एक मूक रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीत शहरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, डॉक्टर्स, वकील, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, व्यापारी व व्यावसायिक या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयएमएने केले आहे.

उच्च न्यायालयाचा आदेश असूनही सुरू आहे दुरुपयोग

मा. उच्च न्यायालयाने डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर आधीच बंदी घातली आहे. परंतु प्रत्यक्षात अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे व तीव्र लेझर लाईटचा वापर केला जातो. काहींच्या बेपर्वाईमुळे संपूर्ण समाज त्रस्त होत आहे, असे आयएमएच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दुष्परिणाम गंभीर – आरोग्यास मोठा धोका

डीजेच्या प्रचंड आवाजामुळे तरुण-तरुणींना, विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना गंभीर त्रास होत असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट केले आहे. काहींना बहिरेपण, हृदयविकाराचा झटका, निद्रानाश, तर लेझर लाईटमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम, कायमस्वरूपी दृष्टीदोष अशा गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. गरोदर महिला, लहान बालकं आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण या दुष्परिणामांना विशेषतः बळी पडतात.

समाजहितासाठी एकजुटीची गरज

“काही व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला आरोग्यविषयक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे डीजे व लेझरविरोधी जनजागृतीसाठी आणि या साधनांच्या कायमस्वरूपी हद्दपारीसाठी नागरिकांनी या रॅलीत सामील होणे आवश्यक आहे. हा केवळ एखाद्या संस्थेचा लढा नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्य व भविष्यासाठीची चळवळ आहे,” असे आवाहन आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

रॅलीला व्यापक प्रतिसादाची अपेक्षा

धुळे शहरातील नागरिकांमध्ये या रॅलीबाबत उत्सुकता असून, विविध शाळा-महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी तयारी दर्शवली आहे. आरोग्य रक्षण, शांतता व सामाजिक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी ही रॅली ऐतिहासिक ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!